Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी बांधून दिलेल्या घरात प्रवेश करताच सूरज चव्हाण भावुक, लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:04 IST

सूरजने एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

Suraj Chavan Thanks Ajit-pawar For New Home: 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. नुकतंच त्यानं आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केलाय.  नवीन घरात प्रवेश केल्यानंतर सूरज चव्हाण खूपच भावुक झाला. हे घर त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिले आहे. अजित पवार यांच्या औदार्याबद्दल सूरजने एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.

सूरजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अजित पवार यांचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात अजित पवार सूरजला त्याचे नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन देताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सूरजनं कृतज्ञता व्यक्त करत लिहलं, "माझ्या नव्या घरात गृहप्रवेश केला… आदरणीय अजितदादा पवार… फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचं घर मिळालं. आपण नेहमी माझ्यासारख्या गोरगरीबाच्या मदतीला येता. यापुढे देखील असेच अनेकांच्या मदतीस याल अशी मला खात्री आहे. यात हस्ते परहस्ते मदत करणाऱ्यांचे देखील मन:पूर्वक आभार".

कसं आहे सूरज चव्हाणचं घर?

सूरजचं घर पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण, सूरजचे हे नवे घर अलिशान, प्रशस्त आणि अत्यंत सुंदर आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा घराचा हॉल असो, मॉड्युलर किचन असो किंवा मोठ्या खोल्या, सगळ्यांचंच इंटिरियर एकदम आकर्षक आणि डोळ्यांना सुखावणारे आहे. रंगसंगती आणि लाईटिंगची व्यवस्था आकर्षक आहे. आता लवकरच या नव्या घरात सूरज होणारी पत्नी संजनासोबत आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.

सूरज चव्हाण हा बारामतीच्या मोढवे गावचा आहे. तो लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यामुळं गरिबीत दिवस काढले. पण टिकटॉकमुळं तो सोशल मीडियावर स्टार झाला. त्यांच्याकडे पैसे येत होते, पण अनेकांनी त्यांची फसवणूक केली होती. यानंतर त्याच्या आयुष्यात गेम चेंजर ठरला तो 'बिग बॉस'. 'बिग बॉस मराठी ५' जिंकल्यानंतर सूरज चव्हाणच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सामान्य कुटुंबातून आलेल्या सूरजचा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Suraj Chavan emotional upon entering house built by Ajit Pawar.

Web Summary : Big Boss Marathi 5 winner Suraj Chavan, overwhelmed entering his new home, thanks Ajit Pawar for gifting it. Chavan shared a video expressing gratitude, acknowledging Pawar's support, and the house boasts luxurious interiors. He plans to start a new life with his wife, Sanjana.
टॅग्स :अजित पवारबिग बॉस १९बिग बॉस मराठी