Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध भावेने सूरज चव्हाणची केली हुबेहूब नक्कल, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 11:51 IST

अभिनेते सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे यांची सूरजसोबत जुगलबंदी रंगली.

Bigg Boss Marathi Season 5 :  'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. रविवारी झालेल्या 'भाऊच्या धक्क्या'वर अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेता आदिनाथ कोठारे हे खास पाहुणे म्हणून 'बिग बॉस'च्या घरात पाहायला मिळाले. या खास पाहुण्यांनी आपापल्या शैलीत सदस्यांचं कौतुकही केलं आणि टीका देखील केली. यावेळी 'बिग बॉस'च्या घरात सुबोध भावे आणि सूरज चव्हाणमध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं.

रविवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये नवीन ट्विस्ट आणि मनोरंजन पाहायला मिळालं. आदिनाथ कोठारे आणि सुबोध भावे हे 'बिग बॉस'च्या घरात पोहचले होते. यावेळी सुबोध भावेने सूरज चव्हाणची हुबेहूब नक्कल केली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये  सुबोध भावे हा सुरजचे लोकप्रिय डायलॉग बोलताना दिसून येतोय. "तू माझ्या दिलाची परी, तुझ्या गालावर खळी, ऐ बच्च्या तुझाचं मी बाहुबली" असं म्हणताना सुबोध भावेने सूरज चव्हाणची हुबेहूब नक्कल केली. याचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधील सूरज चव्हाण हा चर्चेतील स्पर्धक आहे. त्यांची संपुर्ण महाराष्ट्राला भूरळ पडली आहे.  सूरजने आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. झापूक झुपूकवाले त्याचे डायलॉग सर्वांनाच आवडतात. तो अत्यंत साधा आहे.  'बिग बॉस'च्या घरापर्यंत पोहोचलेल्या सूरच चव्हाणचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. आता लोकप्रिय आणि प्रसिद्धीच्या झोतात आला असला तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप खडतर राहिलं आहे. त्यानेच 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी जिंकावी ही त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीसुबोध भावे सेलिब्रिटी