Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्याने लगावली निक्कीच्या कानशिलात? ढसाढसा रडली निक्की! बिग बॉस काय देणार शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:43 IST

आर्या आणि निक्की यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोद्वारे पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi Season 5  : 'बिग बॉस मराठी'चं घर म्हटलं की टास्क, मजा-मस्तीसह वाद, आरडाओरडा, भांडण, तंटा हे सगळं काही आलंच. या नव्या पर्वानेही अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नव्या पर्वात आर्या आणि निक्की अनेकदा एकमेकांसोबत वाद घालताना दिसून आल्या आहेत. कलर्स मराठीने नवा प्रोमो शेअर केला आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज कॅप्टन्सीचा टास्क पार पडणार आहे. या टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. प्रोमोमध्ये दिसते की, अंकिता, वर्षा, आर्या, निक्की आणि जान्हवी या घराच्या वॉशरुममध्ये स्टोनचं संरक्षण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, निक्कीच्या हातात हा स्टोन लागू नये म्हणून आर्या तिचे हात धरत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. "मला धरायचं नाहीये, तुला स्टोनला उचलायचंय" असं निक्की आर्याला सांगते. यात दोघींमध्ये झटपट होते. 

निक्की शेवटी रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन "बिग बॉस… हिने मला मारलंय आणि मी हे सहन करून घेणार नाही. एकतर हिला घराच्या बाहेर काढा प्लीज… नाहीतर मला काढा", असे म्हणते. तर दुसरीकडे आर्या अंकिताला "मला या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नाहीये. होऊ दे काय ते…गेली तर गेली घरी" असं म्हणते. आर्याने हात उगारुन 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केले आहे.  'बिग बॉस'देखील याचा निषेध करतात. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटी