Join us

Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर

By ऋचा वझे | Updated: September 23, 2024 14:12 IST

Bigg Boss Marathi season 5: बिग बॉस मराठी ७० दिवसातच निरोप घेणार, कारण...

Bigg Boss Marathi Season 5:  बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु झाल्यापासूनच चर्चेत आहे. यावेळी महेश मांजरेकर यांच्या जागी रितेश देशमुख होस्ट असल्याने प्रेक्षक उत्सुक होते. बिग बॉस हा गेम १०० दिवसांचा असतो हे सगळ्यांनाच माहित आहे. बिग बॉसचे पहिले चारही पर्व १०० दिवसांचे होते. पण आता पाचवा सीझन केवळ ७० दिवसातच गाशा गुंडाळत आहे हे आता कन्फर्म झालं आहे.

कलर्स मराठीवरील लोकप्रिय बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन १०० नव्हे तर ७० दिवसातच निरोप घेतोय. चॅनलकडून हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. लोकमत फिल्मीशी बातचीत करताना चॅनलने अधिकृतरित्या ही माहिती कन्फर्म केली आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना ते म्हणाले, " होय. बिग बॉस ७० दिवसातच निरोप घेणार आहे. हा अचानक घेतलेला निर्णय आहे. याची कल्पना कोणालाच नव्हती. स्पर्धकांनाही आजच्या एपिसोडमध्ये ही माहिती देण्यात येणार आहे. तसंच शो इतक्या लवकर आटोपता घेण्याचं कारण लवकरच जाहीर करण्यात येईल."

बिग बॉस मध्ये काल भाऊचा धक्का झाला नाही. रितेश देशमुख परदेशात शूट करत असल्याने डॉ निलेश साबळे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. तसंच काल रविवारी नियमाप्रमाणे एलिमिनेशनही झालं ज्यामध्ये अरबाज पटेल घराबाहेर पडला. तर शनिवारी पत्रकार परिषद झाली. हे सगळंच इतक्या लवकर होत असल्याने बिग बॉस लवकर संपत असल्याची कुजबूज सुरु झाली होती. आता हे कन्फर्मही झालं आहे. काही दिवसात बिग बॉस मराठी 5 चा फिनाले पार पडणार आहे. सध्या घरात वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक घरात राहिले आहेत. यांच्यातील कोण ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीटेलिव्हिजन