Abhijeet Sawant : 'सर सुखाची श्रावणी', 'मोहबत्ते लुटाउॅंगा' अशा गाण्यांमुळे अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) हा प्रसिद्धीझोतात आला. 'इंडियन आयडॉल' या लोकप्रिय टीव्ही शोच्या पहिल्या सीझनचा तो विजेता आहे. परंतु, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून हे नाव खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचलं. सध्या अभिजीत सावंत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच अभिजीतने दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील एका कटू अनुभवांवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये अनेक वर्षांपूर्वी काहीही संबंध नसताना त्याचं नाव एका प्रकरणासोहबत जोडण्यात आलं होतं. त्याबद्दल तो पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे.
'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिजीत सावंतने अनेक गोष्टींबद्दल खुलासे केले. त्यादरम्यान, एका अपघाताच्या घटनेचा उल्लेख करताना म्हणाला, "त्यावेळी पोलीस ठाण्यात मी ज्यांना सोडवायला गेलो होतो, त्यांच्यामुळे मला तिथे सकाळी पाच वाजेपर्यंत थांबावं लागलं. त्याचदरम्यान अशी बातमी आली की, या लोकांनी दारु पिऊन रेस लावली आणि त्यामुळे त्यांचा अपघात झाला. ते तीन लोक सुद्धा गायक होते जे पुढे निघाले आणि त्यांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांनी मला फोन करुन कळवलं. मग मी त्यांना शोधत शोधत त्या ठिकाणी पोहोचलो. त्यामध्ये चार मुली असल्याने मी आतमध्ये गेलो. मला जाणं गरजेचं होतं."
पुढे अभिजीतने म्हटलं, "मी आतमध्ये त्यांना समजावण्यासाठी गेलो आणि तेव्हा लोक माझ्यावर भडकले की तू दारु पिऊन आला आहेस असं ते म्हणू लागले. मी म्हटलं ठीक आहे. लोक जमा झालेत, गर्दी आहे तर ते बोलणारच. त्यानंतर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सगळी मीडिया जमा झाली, लोकांची गर्दी झाली. त्या घटनेने अनुभव मिळाला. तेव्हा समजलं की गोष्टी या बदलत असतात. पोलीस स्टेशमनध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला तिथे बसवलं.पोलिसांना कदाचित समजलं असेल की आम्ही दारु प्यायलो नव्हतो. तिथे आम्ही एका एसीरुममध्ये बसलो होतो. आणि तिथे पोलीस एका मुलाला मारत होते. तो एक चोर असावा. तेव्हा पोलिसांनी आम्हाला विचारलं तुम्ही काय खाणार का तुमच्यासाठी बिर्याणी मागवू का असं सगळं तिकडचं वातावरण होतं."
काहीही संबंध नसताना केस झाली...
"त्यावेळी तिथे एक माणूस बाहेरून ओरडत होता की अभिजीत सावंत कोण आहे? त्याला बाहेर काढा. आम्ही त्याला सोडणार नाही. तेव्हा मला मारण्यासाठी लोकांनी, गर्दी केली होती. तेव्हा मी विचार केला की हे जग कसं आहे? मी कोणाशी भांडणही केलं नव्हतं. शिवाय त्या अपघातादरम्यान मी तिथे हजरही नव्हतो. पण, माझ्यावर केस झाली. " असा खुलासा करत अभिजीत सावंतने त्या कटू आठवणी शेअर केल्या.