Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बराच काळ डिप्रेशनमध्ये होतो, कारण...", अभिजीत सावंतचं मानसिक आरोग्यावर भाष्य, नेमकं काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:49 IST

"बराच काळ डिप्रेशनमध्ये होतो, कारण ...", अभिजीत सावंतचं मानसिक आरोग्यावर भाष्य, म्हणाला- कोविडमध्ये...

Abhijeet Sawant : अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) हे नाव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असं नाव आहे. इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा तो विजेता ठरला आणि त्याचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं. अभिजीतने आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सर सुखाची श्रावणी त्याच्या आवाजातील गाण्याने तरुणाईला अक्षरश वेड लावलं. त्यानंतर अभिजीत सावंत चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. अशातच आता एका मुलाखतीमध्ये अभिजीत सावंतने मानसिक स्वास्थाविषयी मोकळेपणाने मत मांडलं आहे.

अलिकडेच अभिजीत सावंतने 'राजश्री मराठी'ला दिली. या मुलाखतीमध्ये अभिजीतने मानसिक स्वास्थावर भाष्य केलं. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "मी बराच काळ डिप्रेशनमध्ये होतो. पण, तो माझ्यासाठी फार कठीण काळ होता. म्हणजे, तेव्हा माझं काम सुरळीत चालू होतं. सगळे शोज चालू होते. मी प्रवास खूप करायचो. पण, जसं एक विचार सातत्याने आपल्या डोक्यात असतो तो म्हणजे की, आता पुढे काय? याबद्दल जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुमच्यासोबत नक्की काय चाललंय याकडे तुमचं लक्षच नसतं किंवा त्या गोष्टींना तुम्ही टाळत असता. असं माझ्याबाबतीत त्या वेळी घडलं होतं. त्यावेळी मग विचार करुन जो दिवस आहे तो सुद्धा खूप वाईट जायचा. पुढे काय होणार? याचाच विचार डोक्यात यायचा. त्यावेळेस माझ्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झाला."

त्यानंतर पुढे अभिजीत सावंत म्हणाला, "कोविडमध्ये अशाच अडचणी वाढत चालल्या होत्या. तेव्हा मला जाणीव झाली की आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत किंवा तुम्हाला ती परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी तुम्हालाच प्रयत्नच करायचे आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सामोरं जायचं आहे. तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकत बसू नका. आरडाओरडा करून काहीच होणार नाही. कारण ती तुमची समस्या आहे. त्यासाठी तुम्ही लोकांना का त्रास देताय. शिवाय लोकांना त्यांचे प्रोब्लेम्स असतात. तेव्हा मला वाटलं की, आपल्याला स्वत: लाच यातून बाहेर यावं लागणार आहे. असं केल्याने माझ्यासोबत बऱ्याच चांगल्या गोष्टी घडू लागल्या." असा खुलासा अभिजीत सावंतने केला. 

टॅग्स :अभिजीत सावंतटिव्ही कलाकार