Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी माणसाची माफी मागा...", पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुख घेणार निक्कीची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 17:38 IST

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही", असं म्हणत रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन नुकताच भेटीला आला आहे. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. दरम्यान आज रितेश देशमुखने 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील उद्धट सदस्यांची शाळा घेतली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही", असं म्हणत रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोडंचं पाणी पळालं तर काहींच्या काळजाचं पाणीपाणी झालं.  

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. 'बिग बॉस मराठी'च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर तिचा माज उतरवणार आहे.निक्की तांबोळी 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे.

ती भाषा मी खपवून घेणार नाही...

रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,"वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही. त्यांचं कतृत्व, काम याचा आदर झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय. आताच्या आता माझ्या मराठी माणसाची माफी मागा." 

रितेश पुढे म्हणाला,"'बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार".

टॅग्स :रितेश देशमुखबिग बॉस मराठी