Join us

‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन कधी येणार? ‘या’ महिन्यात चाहत्यांची संपणार प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 14:48 IST

Bigg Boss Marathi Season 4 : बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन हा जवळपास दोन वर्षांनंतर लाँच झाला होता. पण चौथ्या सीझनसाठी मात्र प्रेक्षकांना फार प्रतीक्षा करावी लागणार नाही...

Bigg Boss Marathi Season 4 : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन चांगलाच गाजला. यातील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा झाली. बिग बॉसच्या घरातील राडे, प्रेम, भावुक क्षण सर्वच प्रेक्षकांनी एन्जॉय केलं आणि बघता बघता 100 दिवस पूर्ण झालेत.  26 डिसेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड फिनाले रंगला आणि विशाल निकम हा या शोचा विजेता ठरला. साहजिकच तिसरा सीझन संपल्या संपल्या चौथ्या सीझन कधी येणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला असेलच. तर आता त्याचंही उत्तर तयार आहे. होय, ‘बिग बॉस मराठी’चा चौथ्या सीझन लवकरच तुमच्या आमच्या भेटीस येतोय.

‘बिग बॉस मराठी 3’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, निर्मात्यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनची तयारी सुरू केली आहे. ‘बिग बॉस मराठी 3’च्या ग्रँड फिनालेमध्येच निर्मात्यांनी याचे संकेत दिले होते. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन येत्या एप्रिल महिन्यात सुरू होणार, अशी शक्यता आहे. ‘कलर्स मराठी’शी याबाबत संपर्क साधला असता,बिग बॉसचा चौथा सीझन लवकरच येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. अर्थात कधी, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

 बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन संपल्यानंतर तिसरा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती. कोरोना महामारीमुळे शूटींग बंद असल्याने हा सीझन लांबला होता. पण चौथ्या सीझनसाठी मात्र प्रेक्षकांना फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. तूर्तास चौथ्या सीझनचं काम सुरू झालं आहे. या येत्या सीझनमध्येही प्रेक्षकांना भरपूर सरप्राईज मिळणार आहेत. स्पर्धकांच्या नावांचा शोधही सुरू झाली आहे आणि आता फक्त एप्रिल महिन्याची प्रतीक्षा आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठी