Join us

'बिग बॉस मराठी'त मोठा ट्वीस्ट, या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी कोण नॉमिनेट झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 08:56 IST

Bigg Boss Marathi 5 Nomination : ' बिग बॉस मराठी'मध्ये रोज नवा ड्रामा पाहायला मिळतो. भांडणं, रडारड आणि वादांमुळे ...

Bigg Boss Marathi 5 Nomination : 'बिग बॉस मराठी'मध्ये रोज नवा ड्रामा पाहायला मिळतो. भांडणं, रडारड आणि वादांमुळे हे घर नेहमी चर्चेत येते. आता 'बिग बॉस'च्या घरात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. पहिल्यांदाच थेट नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. यापूर्वीच्या टास्कमध्ये सदस्यांनी खेळ खेळत, जोड्या बनवत, प्लॅनिंग करत आपल्याला घरात नको असणाऱ्या सदस्यांना नॉमिनेट केलं होतं. परंतु, यावेळी 'बिग बॉस'ने  कोणताही नॉमिनेशन टास्क प्रत्येकाला थेट नॉमिनेट केलं आहे. 

'बिग बॉस'च्या घरातील एकूण आठ सदस्य अर्थात निक्की, अभिजीत, सूरज, वर्षा, जान्हवी, अंकिता, पंढरीनाथ, धनंजय हे घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. सदस्यांना नॉमिनेट केल्यानंतर बिग बॉस'ने घरात दोन टीम केल्या. टीम A मध्ये निक्की, अभिजीत, सूरज, वर्षा. तर टीम B मध्ये जान्हवी, अंकिता, पंढरीनाथ, धनंजय. एका-एका सदस्याने  विरुद्ध गटातील कोणत्याही दोन सदस्यांना टार्गेट करायचं होतं. घरात ज्या दोन सदस्यांना ठामपणे आपली मतं मांडता येत नाहीत, हा निकष लावण्यात आला. टार्गेट सदस्याच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर फुली मारायचा हा टास्क होता. जेणेकरून व्होटिंग करताना प्रेक्षक या सगळ्या निकषांचा विचार करतील.

यंदाचा 'बिग बॉस' हा 100 दिवसांचा नाही तर  70 दिवसांचा आहे. याबाबत ‘बिग बॉस’कडून घरातील सदस्यांसमोर अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली आहे. 28 जुलैला घरात एकूण 16 सदस्यांनी प्रवेश घेतला होता. यानंतर वाइल्ड कार्ड म्हणून संग्राम चौगुलेची घरात एन्ट्री झाली. म्हणजेच यंदाच्या पाचव्या पर्वात एकूण 17 स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी 9 सदस्यांनी आतापर्यंत घराचा निरोप घेतला आहे. तर, उर्वरित 8 जणांमध्ये आता 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकण्यासाठी लढत होणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीरितेश देशमुख