Join us

Bigg boss marathi: जय-मीराकडे मोठ्या प्रोजेक्ट्सची रांग; आनंद शिंदेंच्या नव्या गाण्यात झळकणार ही जोडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:00 IST

Jay dudhane and meera jagannath: हे दोन्ही स्पर्धक टास्क खेळण्यासोबतच घरातील वादविवादांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिले. परंतु, हा शो संपल्यानंतर या दोघांकडे मोठमोठ्या प्रोजेक्ट्सची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे.

छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व (bigg boss marathi 3) चांगलंच गाजलं. या पर्वात सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक त्यांच्या टास्क खेळण्यामुळेच चर्चेत आला. यात खासकरुन मीरा जगन्नाथ (meera jagannath) आणि जय दुधाणे (jay dudhane) या दोघांची तुफान चर्चा रंगली. हे दोन्ही स्पर्धक टास्क खेळण्यासोबतच घरातील वादविवादांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिले. परंतु, हा शो संपल्यानंतर या दोघांकडे मोठमोठ्या प्रोजेक्ट्सची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेमध्ये चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjarekar) यांनी जय दुधाणे याला त्यांच्या आगामी चित्रपटाची ऑफर दिली. त्यामुळे जय लवकरच 'शनिवार वाडा' या चित्रपटात झळकणार आहे. सोबतच आता तो प्रसिद्ध गायक आणि 'बिग बॉस'फेम उत्तर्ष शिंदे (utkarsh shinde) याचे वडील आनंद शिंदे (anand shinde) यांच्या आगामी गाण्यात झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच मीरा जगन्नाथदेखील या गाण्यात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

 'एज्युकेशन लोन भरलं अन् दहाव्या दिवशी...';  स्ट्रगल काळातील आठवणींमुळे मीनल शाह भावूक

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये आनंद शिंदे यांच्या आगामी गाण्यात जय-मीरा झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आनंद शिंदे यांनी या दोन्ही कलाकारांना ऑफर दिली आहे, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, आनंद शिंदे यांनी एकाहून एक सरस गाणी मराठी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. त्यांच्या सगळ्याच गाण्यांवर रसिक मनसोक्त ताल धरतात. आज आनंद शिंदे हे प्रसिद्ध गायक असून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजनमहेश मांजरेकर