Join us

"किडनीचा त्रास अन् फुफ्फुसांना सूज..." घनश्याम दरवडेनं 'त्या' आजारपणाबद्दल पहिल्यांदाच सांगितलं! म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:27 IST

घनश्याम दरवडेनं 'त्या' आजारपणाबद्दल पहिल्यांदाच केला खुलासा! म्हणाला- "माझं बालपण हॉस्पिटलमध्येच..."

Ghanshyam Darode : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व चांगलचं गाजलं होतं. या पर्वात सहभागी होऊन छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरवडे (Ghanshyam Darode) प्रसिद्धीझोतात आला. 'बिग बॉस'च्या घरात त्याने राडा केला होता. परंतु, अगदी सहाव्या आठवड्यातच तो इलिमिनेट झाला. बिग बॉस आता हा शो संपल्यावर देखील घनश्याम कायम चर्चेत येत असतो. अशातच आता नुकत्याच मुलाखतीदरम्यान घनश्याम लहानपणापासून एका गंभीर आजराचा सामना करतोय असा खुलासा त्याने केला आहे. 

नुकतीच घनश्यामने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, आपल्या आपल्या आजारपणाविषयी त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये घनश्याम म्हणाला, "माझं बालपण हॉस्पिटलमध्येच गेलं आहे. त्यामुळे माझं बालपण आणि तरुणपण आता सुरू आहे. मी सहा वर्षांचा होईपर्यंत हॉस्पिटलमध्येच होतो. कारण, मला जन्मत:च काही त्रास होता. मला लिव्हर आणि किडनीचा त्रास होता, अजूनही आहे. माझी उंची कमी असल्यामुळे गावी मला डावललं जायचं, पण त्यावर मात करीत मी पुढे आलो."

लिव्हर फुफ्फुसांना सूज अन्...

त्यानंतर पुढे त्याने सांगितंलं, "माझ्या वयाच्या सगळ्यांची उंची वाढत होती. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल वारंवार विचारायचो. पण ते मला तेव्हा काहीही सांगत नव्हते. माझी सहनशक्ती संपली त्यामुळे मी थेट डॉक्टरांनाच याबद्दल विचारलं. कारण एकीकडे मला समाजाचा त्रास होता आणि त्यात घरचेही काही सांगत नव्हते. त्यामुळे मी थेट डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला आनुवंशिकतेचा त्रास आहे. तेव्हाच मला थायरॉईडचा त्रास होता. माझ्या लिव्हर आणि फुप्फुसांना सूज आहे. मी आजही इंजेक्शन घेतो. कारण, माझं रक्त आपोआप तयार होत नाही. रक्त शुद्ध करण्यासाठी मला इंजेक्शन घ्यावं लागतं. त्यात मला क्रिएटीन आहे, त्यामुळे माझ्या किडनीलाही त्रास आहे." याबद्दल सांगताना घनश्याम भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 

टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉससेलिब्रिटी