Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'आई तुळजाभवानी' मालिकेत एन्ट्री, शुंभाच्या भूमिकेत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:30 IST

'आई तुळजाभवानी' मालिकेत बिग बॉस मराठी गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचा एन्ट्री होणार आहे (aai tuljabhavani)

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. महिषासुराला अनुभूतीच्या आश्रमात भेटलेली ‘तुळजा’ हीच देवी असल्याचा साक्षात्कार असल्याचा क्षण जवळ आला आहे. महिषासुराचा दूत ताम्रासुर याला देवीने करून दिलेली अष्टभुजा रूपातली ओळख आणि त्याने कथानकाला मिळालेली कलाटणी या दैवी अध्यायाचा विलक्षण टप्पा सध्या सुरू आहे. या कथानकाच्या वळणावर नियतीची अनपेक्षित रचना पाहायला मिळणार आहे. आणि यातच महिषासुराच्या आयुष्यात शुंभा नावाच्या स्त्रीचा प्रवेश घडणार आहे.

सोनाली पाटील म्हणाली, " आजवर तुम्ही मला अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहिले आहे. आता बिग बॉस मराठीनंतर मी पुन्हाएकदा कलर्स मराठीशी जोडली गेली आहे याचा मला आनंद आहे. आई तुळजाभवानी मालिकेत मी शुंभा म्हणजेच असूर राज महिषासुराच्या आयुष्यात येणाऱ्या एका महत्वपूर्ण स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही महत्वपूर्ण भूमिका कोणती हे मालिकेत आता उलगडत आहे. देवीवर असलेल्या आस्थेमुळे मी हि मालिका करण्याचा निर्णय घेतला."

"शुंभा तटस्थ, देखणी आहे तुम्हांला नक्की बघायला आवडेल याची मला खात्री आहे. अतिशय सुंदर लूक केला आहे शुंभाचा, विविध प्रकारची आभूषणं, साड्या... साडी परिधान करण्यासाठी खूप वेळ लागतो जवळपास मला तयार होण्यासाठी दिड तास लागतो. रोल खुपचं वेगळा आहे त्यामुळे मला तयारी तर नक्कीच करावी लागली कारण अश्याप्रकाराची भूमिका पहिल्यांदाच करते आहे. पण, मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल."

 ही शुंभा नेमकी कोण ? तिचे महिषासुराच्या आयुष्यात अचानक येण्याचे प्रयोजन काय ? हा रंजक कथाभाग आई तुळजाभवानीच्या आगामी भागात उलगडणार आहे.  लोकप्रिय अभिनेत्री सोनाली पाटील ही भूमिका साकारते आहे. 'आई तुळजाभवानी' मालिका सोम ते शनि रात्री ९.०० वा कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे. 

टॅग्स :कलर्स मराठीतुळजापूर