Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्याखाली डार्क सर्कल्स, पांढरी दाढी अन्...; अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:22 IST

व्हिडिओत दिसणारी ही अभिनेत्री मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, सध्या मात्र तिची अवस्था पाहून तिला ओळखताही येत नाहीये.

सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका मराठी अभिनेत्रीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्रीची अवस्था पाहून तिला ओळखणंही कठीण झालं आहे. व्हिडिओत दिसणारी ही अभिनेत्री मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, सध्या मात्र तिची अवस्था पाहून तिला ओळखताही येत नाहीये. अभिनेत्रीच्या या व्हिडिओने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

या व्हिडिओत अभिनेत्रीच्या डोळ्यांची खाली डार्क सर्कल वाढल्याचं दिसत आहे. तसंच तिला पांढरी दाढी असल्याचंही दिसत आहे. अभिनेत्रीचा अवतार पाहून चाहते पेचात पडले आहेत. पुढे व्हिडिओत अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना तिला ओळखता येणंही कठीण झालं आहे. व्हिडिओत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकर आहे. 

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या जान्हवी 'अबोली' मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचा हा एक लूक आहे. या लूकच्या मेकअपदरम्यानचा व्हिडिओ जान्हवीने शेअर केला आहे. दरम्यान, जान्हवीने आणखी काही मालिकांमध्ये याआधी काम केलं आहे. खलनायिकेच्या भूमिकेत तिला प्रसिद्धी मिळाली. 

टॅग्स :टिव्ही कलाकार