Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi : अभिजीत बिचुकलेंनी घेतला महेश मांजरेकरांशी पंगा, म्हणाले - 'तिथे पैसे घेऊन...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 13:45 IST

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठी २ मधील स्पर्धक अभिजीत बिचुकलेंनी पुन्हा एकदा बिग बॉसच्या सूत्रसंचालकांशी पंगा घेतला आहे. बिचुकलेनं थेट मांजरेकरांना चॅलेंज दिले आहे.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर बिग बॉस मराठी शोमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका उत्तमपणे पार पाडत आहे. दरम्यान मागच्या तिन्ही सीझनमध्ये अनेक कॉन्ट्रोवर्सी झाल्या. अनेक कलाकारांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. त्यातील काही स्पर्धक आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिजीत बिचुकले.बिग बॉस मराठीचा चौथा सीझन येत असताना बिचुकले यांनी भविष्यात मी बिग बॉसचा अँकर असेन, असे म्हटलं आहे.

नुकताच बिग बॉस मराठी ४ची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महेश मांजरेकरांची ग्रँड एंट्री झाली. दरम्यान बिग बॉसच्या घरात पहिल्या तीन सीझनमधील कोणत्या स्पर्धकांना पुन्हा पाहायला आवडेल आणि कोणाला नाही असा प्रश्न विचारला असता मांजरेकर यांनी अभिजीत बिचुकलेंना पाहायला आवडणार नाही असे सांगितले. महेश मांजरेकर म्हणाले, 'बिचुकले गेममध्ये सहभाग घेत नव्हता. त्याच्यात तो युएसपी आहे पण तो किती वेळ पाहणार. घरात ऑलराऊंडर प्लेअर पाहिजेच. तिथे असलेल्या प्रत्येकाचा एक युएसपी आहे.

अभिजीत बिचुकलेंबद्दल महेश मांजरेकरांनी केलेल्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत बिचुकलेंनी भविष्यात मी बिग बॉस मराठीचा अँकर असेन असे चॅलेंज दिले. ते म्हणाले, 'महेश मांजरेकर पैसे घेऊन तिथे नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटला किती महत्त्व द्यायचे. एंडोमोल कंपनीनं मला मोठे केले. सेकंड सीझन कोणामुळे गाजला? मी किती टीआरपी दिला? याची  एंडोमोल कंपनीला जाण असेल तर महेश मांजरेकर यांच्या कोणत्याही वक्तव्याला ते महत्त्व देणार नाही.  भविष्यात मी बिग बॉसचा अँकर होईन असा मला विश्वास आहे. केवळ मराठीच नाही तर त्यानंतर हिंदी बिग बॉसमध्येही अभिजीत बिचुकले यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. थेट सलमान खानसोबत पंगा घेतला होता. 
टॅग्स :अभिजीत बिचुकलेमहेश मांजरेकर बिग बॉस मराठी