Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व नुकतंच संपलं आहे. अभिनेत्री तन्वी कोलतेने या सीझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर, शोचा उपविजेता ठरला आहे राकेश बापट.तन्वीने पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस मराठी’चं घर गाजवलं. तन्वी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतल्यापासूनच प्रचंड चर्चेत होती. अनेकांनी तिच्याबद्दल खूप बोलते असं म्हटलं होतं. पण, त्यानंतर तन्वीने तिचा गेम पूर्णपणे बदलला आणि फायनलपर्यंत धडक देत थेट बिग बॉसची ट्रॉफी उंचावली. आता तन्वी विविध ठिकाणी मुलाखती देताना दिसते आहे. यादरम्यान, बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर हिंदी बिग बॉसमध्ये जायला आवडेल का? यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर तन्वी कोलतने नवशक्तीला मुलाखत दिली. या दरम्यान, मराठी बिग बॉस झाला आता हिंदी बिग बॉसमध्ये तन्वी कोलते जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत तन्वी कोलते म्हणाली, नक्कीच. ऑफर आली तर मी नक्की जाईन.तिथे पण माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करेन. मला खेळायला आवडेल.
राखी सावंतने देखील ही इच्छा बोलून दाखवली, तिला काय सांगशील. असा प्रश्न विचारला असता तन्वीने म्हटलं, राखीचीच इच्छा आहे की मी हिंदी बिग बॉसमध्ये जावं. ती आल्यापासून मला तेच म्हणतेय की तू हिंदी बिग बॉस मराठी मटेरिअल आहे, तू तिथे पण छान खेळशील. मला आधी माझ्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवायचं आहे, त्यानंतर मी विचार करेन. मराठीची मी विनर झाले आहे. पण, हिंदीसाठी देखील मी प्रयत्न करेन. मला माहित नाही काय होईल. पण, माझे प्रयत्न सुरु राहतील.
यानंतर तन्वी कोलते २.० पाहायला मिळणार आहे का? यावर तन्वी म्हणाली," २.० असं काही नाही. आतमध्ये गेले होते, तेव्हा तन्वी कोलते म्हणून गेले होते. आता तन्वी कोलते ब्रॅण्ड म्हणून आली आहे. तो ब्रॅण्ड माझ्या जनतेने केला आहे. जनतेने ही मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे आणि ती मला पार पाडायची आहे. शिवाय ज्या प्रकारे जनतेने मला प्रेम दिलंय. त्या प्रकारे जनता मला पुढेही प्रेम देत राहिल.त्यांच्या प्रेमाला मी खरी उतरेन. त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती ढासळू न देता पार पाडेन, असं मला वाटतं."
Web Summary : After winning 'Bigg Boss Marathi,' Tanvi Kolte is open to joining 'Bigg Boss Hindi' if offered. Rakhi Sawant encouraged her participation, believing she'd excel. Kolte aims to honor the brand her fans created.
Web Summary : 'बिग बॉस मराठी' जीतने के बाद, तन्वी कोलते को 'बिग बॉस हिंदी' में शामिल होने में कोई आपत्ति नहीं है। राखी सावंत ने उन्हें भाग लेने के लिए प्रोत्साहित किया, यह मानते हुए कि वह उत्कृष्ट प्रदर्शन करेंगी। कोलते अपने प्रशंसकों द्वारा बनाए गए ब्रांड का सम्मान करना चाहती हैं।