Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अनेक कारणांमुळे हे पर्व चर्चेत होतं. घरात भांडण-तंट्यासोबतच काही जोड्याही बनल्या होत्या. तर काहींची घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती. बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांच्यामध्ये चांगली मैत्री झाल्याचं दिसलं होतं. विशाल आणि रुचिताने एकमेकांना त्यांच्याबद्दलच्या भावनाही बोलून दाखवल्या होत्या. त्यांच्या नात्याबद्दल आता विशालने घराबाहेर येताच प्रतिक्रिया दिली आहे.
विशाल कोटियन इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "रुतिचा ही एक वेगळी पर्सनालिटी होती. माझा आणि रुचिताचं काही जुळत नाही. आमच्यात १५ वर्षांचं अंतर आहे. ती जी भाषा बोलत होती ती मला कळत नव्हती. मी मुंबईचा आहे आणि मुंबईत अशी भाषा आपण वापरत नाही. मला तिच्या भाषेविषयी खूप उत्सुकता होती. ती फक्त शब्दाने उद्धट आहे, खऱ्या आयुष्यात ती तशी नव्हती आणि तिची ही बाजू मी बघितली आहे. बिग बॉसच्या घरात रुचिता फक्त माझं ऐकायची. आणि त्यानंतर तिच्यात खूप सुधारणाही झाली होती. एक मुलगा आणि मुलगी जर बोलत असतील, त्यावरून लोकांना वाटतं ह्यांच्यात काहीतरी लफडं आहे. त्या घरात कोणावरही विश्वास ठेवणं खूप अवघड जातं. आमचा एकमेकांवर खूप विश्वास होता. आमचं कधीही लफडं नव्हतं. आमच्यात कधीच लव्ह अँगल नव्हता".
रुचितानेही घराबाहेर आल्यानंतर विशालसोबत फक्त चांगल्या मैत्रीचं नातं होतं, असं म्हटलं होतं. विशाल हा 'बिग बॉस मराठी ६'च्या टॉप ५ मध्ये होता. पण, त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. विशालने पहिल्या दिवसापासूनच खेळ खेळायला आणि स्ट्रॅटेजी बनवायला सुरुवात केली होती. मात्र त्याला ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. तन्वी कोलते हिने 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी जिंकली. तर राकेश बापट उपविजेता ठरला.
Web Summary : Vishal Kotian clarified his relationship with Ruchita Jamdar post Bigg Boss Marathi 6. He emphasized their strong friendship, dismissing romantic rumors due to their age gap and different backgrounds. He valued her unique personality and growth in the house.
Web Summary : विशाल कोटियन ने बिग बॉस मराठी 6 के बाद रुचिरा जामदार के साथ अपने रिश्ते को स्पष्ट किया। उन्होंने उनकी मजबूत दोस्ती पर जोर दिया, उम्र के अंतर और अलग पृष्ठभूमि के कारण रोमांटिक अफवाहों को खारिज कर दिया। उन्होंने घर में उनके अनूठे व्यक्तित्व और विकास को महत्व दिया।