Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा सहावा आठवडा सुरू आहे. दिवसागणिक घरातील स्पर्धकांच्या मैत्रिची समीकरणं बदलताना दिसत आहेत. घरात राखीने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यापासून तिने सदस्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. आता राखीने तिचा माइंड गेम खेळत तन्वी आणि प्रभूच्या मैत्रीत मिठाचा खडा टाकला आहे. त्यामुळे तन्वी आणि प्रभूमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरातील एक नवा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये राखी प्रभूला भडकवत असल्याचं दिसत आहे. ती तन्वीवरुन त्याला म्हणते, "तू इथे पदर पकडायला आलेला नाहीस. तू स्पर्धक म्हणून आला आहेस. स्वत:साठी खेळ". त्यावर तन्वी चिडून बोलते "ही काहीही काय बोलतेय". त्यानंतर प्रभू म्हणतो, "एकाही निर्णयात मला घेतलं नाही. मग मी एकटा काय करू?". राखीनंतर तन्वी प्रभूवरही चिडत असल्याचं दिसत आहे. ती त्याला म्हणते, "तुला वाटत असेल की पदर पकडून फिरतोस तर उद्यापासून माझा पदर पकडू नकोस".
तन्वीच्या वागण्याने प्रभू दुखावत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर त्याला रडू कोसळल्याचंही पाहायला मिळत आहे. राखी प्रभूला म्हणते, "तू बनवलंस तिला कॅप्टन...बघितलंस आता...सॉरी मी तुझ्यासाठी काही नाही करू शकत". आता तन्वी आणि प्रभूच्या मैत्रीत यावरुन फूट पडणार का? हे पाहावं लागेल.
Web Summary : Rakhi's wild card entry stirs trouble in Bigg Boss Marathi 6. She instigates a fight between Tanvi and Prabhu, leading to a rift in their friendship after Tanvi becomes captain. Prabhu is left heartbroken by Tanvi's changed behavior.
Web Summary : राखी की वाइल्ड कार्ड एंट्री से बिग बॉस मराठी 6 में तहलका। राखी ने तन्वी और प्रभु के बीच लड़ाई करवाई, जिससे तन्वी के कप्तान बनने के बाद उनकी दोस्ती में दरार आ गई। तन्वी के बदले हुए व्यवहार से प्रभु का दिल टूट गया।