'बिग बॉस मराठी ६'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये विविध स्पर्धक प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. अशातच 'बिग बॉस मराठी ६' मध्ये काल दुसरं एलिमिनेशन पार पडलं. या एलिमिनेशनमधून अभिनेत्री सोनाली राऊत घराबाहेर गेली आहे. या आठवड्यात सोनालीसह करण, प्राजक्ता, विशाल, रुचिता, ओंमकार, प्रभू, दीपाली हे आठजण नॉमिनेट होते. त्यापैकी सोनालीला घराबाहेर जावं लागलं आहे. सोनाली घराबाहेर जाताना काय म्हणाली, जाणून घ्या. सोनाली घराबाहेर जाताना काय म्हणालीरितेश देशमुखने सोनाली राऊतच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी सोनालीने निर्णयाचा स्वीकार केला. बरेचसे स्पर्धक बिग बॉसचं घर सोडताना रडताना दिसतात. परंतु सोनाली मात्र शांतपणे घराबाहेर पडली. तिला निरोप देताना काही सदस्य भावुक झाले होते. तेव्हा सोनाली सर्वांना उद्देशून म्हणाली, ''काय सगळे ड्रामा करतात. माय गॉड. एवढा ड्रामा तर मी पण नाही केला! किती तो ड्रामा करताय''.
सोनाली जेव्हा स्टेजवर आली तेव्हा रितेश देशमुखनेही तिला काय चूक घडली असं विचारलं. तेव्हा ती म्हणाली,'' माझ्या अपेक्षा खूप जास्त होत्या. परंतु त्या अपेक्षा इथे पूर्ण नाही झाल्या. जे काही स्पर्धक होते त्यांच्याशी मी रिलेट नाही करु शकले. तिथे मी कमी पडली असेल.'', असं मत सोनालीने दिलं. अशाप्रकारे घराबाहेर जाताना सोनालीने तिचं मत व्यक्त केलं. सोनाली सुरुवातीला घरातील एक स्ट्रॉँग स्पर्धक वाटत होती. परंतु हळूहळू तिचा खेळ कमी पडला. सोनाली इतकी काम करतानाही दिसायची नाही. अखेर सोनालीला घराबाहेर जावं लागलं.
Web Summary : Actress Sonali Raut was eliminated from Bigg Boss Marathi 6. She remarked on the excessive drama during her exit. Raut felt she couldn't connect with other contestants and her expectations weren't met. She acknowledged falling short in the game.
Web Summary : अभिनेत्री सोनाली राउत बिग बॉस मराठी 6 से बाहर हो गईं। उन्होंने बाहर निकलते समय अत्यधिक नाटक पर टिप्पणी की। राउत को लगा कि वह अन्य प्रतियोगियों से जुड़ नहीं पाईं और उनकी उम्मीदें पूरी नहीं हुईं। उन्होंने खेल में कम पड़ने की बात स्वीकार की।