Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या गेल्या आठवड्यात रुचिता जामदारने घरातून एक्झिट घेतली. रुचिताच्या एक्झिटने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. घरातील सदस्य आणि चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. पण घराबाहेर येताच रुचिताने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुरुवातीला रुचिता आणि तन्वीमध्ये मैत्री झाल्याचं दिसलं होतं. मात्र ही मैत्री फार काळ टिकली नाही. तन्वी टोळीतून बाहेर पडल्यानंतर रुचितासोबत तिचं अनेकदा भांडण झालं. अनेकदा तन्वीबद्दल बोलताना रुचिताची जीभ घसरली. त्यावरुन तिला भाऊच्या धक्क्यावरही सुनावण्यात आलं होतं. मात्र आता घराबाहेर येताच रुचिताने तन्वीच्या सोज्वळपणाचा बुरखा फाडला आहे.
रुचिताने घराबाहेर येताच अनेक सदस्यांबाबत भांडाफोड केला आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रुचिताने तन्वीला खरकटी म्हणण्याबद्दलही स्पष्टीकरण दिलं. ती म्हणाली, "मी कधीच वेगळ्या अर्थाने तो शब्द वापरला नव्हता. मला तन्वीचा गेम पहिल्या दिवसापासून कळला होता. तिला माहीत होतं की, मी टास्कमध्ये आक्रमक होते. तिला पाहिजे होते की, मी यामध्ये कुठेतरी हातापायी करावी आणि शोच्या बाहेर जावं. म्हणून तिने एक नवीन स्ट्रटेजी काढली होती की, रुचिताच्या इतक्या जवळ जायचं की, कुठेतरी धक्काबुकी होईल आणि ती शोच्या बाहेर जाईल".
"आता साहजिकच हे दाखवलं गेलं नाहीये. पण शोमध्ये सगळ्यांना माहीत होतं की, मला स्मोकिंगचा खूप त्रास आहे. मला तो वास सहन होत नाही. तन्वी प्रत्येक भांडणाआधी स्मोक करून यायची आणि माझ्या खूप जवळ येऊन बोलायची, जे मला सहन होत नव्हतं. कदाचित ती हे मुद्दाम करत होती की, मी तिला धक्का देईन, म्हणून मी त्यावेळी तिला खरकटी म्हटलं होतं. कारण, मला तो वास येत होता. पण त्या शब्दाचा खूप वेगळा अर्थ काढण्यात आला. हे मला बाहेर आल्यानंतर कळलं, मी भाऊच्या धक्क्यावर याबद्दल स्पष्टीकरणही दिलं होतं, पण ते दाखवण्यात आलं नाही", असंही रुचिता म्हणाली.
Web Summary : Ruchita Jamdar, evicted from Bigg Boss Marathi, reveals Tanvi used smoking to provoke her during arguments, exploiting Ruchita's sensitivity to smoke. Ruchita clarified her controversial word choice, attributing it to Tanvi's deliberate strategy to trigger a physical reaction.
Web Summary : बिग बॉस मराठी से बाहर हुईं रुचिता जामदार ने खुलासा किया कि तन्वी बहस के दौरान उसे भड़काने के लिए धूम्रपान का इस्तेमाल करती थी, रुचिता की धुएं के प्रति संवेदनशीलता का फायदा उठाती थी। रुचिता ने अपने विवादास्पद शब्द विकल्प को स्पष्ट करते हुए इसे तन्वी की शारीरिक प्रतिक्रिया को भड़काने की जानबूझकर रणनीति बताया।