Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6: स्वतःला सिद्ध करण्यासाठी दिव्या शिंदे सगळ्यांच्या विरोधात उभी राहणार, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 11:36 IST

'बिग बॉस मराठी ६' मध्ये घरात कॅप्टनसी पदासाठी टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये दिव्या शिंदे संपूर्ण घराच्या विरोधात जाताना दिसली

कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या घरात खेळ आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. घरात प्रत्येक सदस्य स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असतानाच, आता 'कॅप्टन्सी' वरून घरात मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोवरून दिसतंय की, कॅप्टनसीसाठी दिव्या स्वतःची क्षमता सिद्ध करतेय. पण दिव्याच्या कॅप्टन्सी क्षमतेवर इतर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दिव्याच्या क्षमतेवर घरच्यांचे प्रश्न

प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर एकत्र बसले आहेत. यावेळी काही सदस्यांनी दिव्यावर थेट निशाणा साधला आहे. अनुश्री म्हणताना दिसतोय की, "दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही," तर दुसरीकडे रुचिताने मत मांडले की, "कॅप्टन असा असावा ज्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे नीट ऐकून घेतले पाहिजे. त्यात सुमित आणि सागर यांचे म्हणणे पडले. दिव्या mature नाहीये अजून, "अनुभवाच्या जोरावर दिव्या इतरांपेक्षा थोडी कमी पडते.

घरातील सदस्यांनी लावलेल्या आरोपांनंतर दिव्या शांत बसलेली नाही. तिने आपली बाजू मांडली आहे. दिव्या म्हणते, "अनुभव जन्मतः कोणालाच नसतो. जर तुम्ही असं म्हणत असाल, तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते!" दिव्याचा हा करारी बाणा पाहून आता घरातील समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आता दिव्या तिचे मुद्दे घरच्यांना पटवून देऊ शकेल का? की तिला या कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल? कोण बनणार घराचा कॅप्टन ?  हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi 6: Divya stands against all for captaincy.

Web Summary : In Bigg Boss Marathi 6, Divya Shinde is determined to prove herself for captaincy. Housemates question her capabilities, citing inexperience. Divya confronts them, asserting her readiness to fight against everyone to earn the captaincy.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनटिव्ही कलाकार