'बिग बॉस मराठी ६' जसं सुरु झालं तेव्हापासून अनुश्री माने हे नाव चर्चेत आहे. कधी तिला ट्रोल केलं गेलं, कधी तिच्यावर मीम्स बनले, अनेकजण तिच्यावर हसले तर कधी तिच्या गेमचं कौतुकही झालं. अनुश्रीचं वागणं अनेकांना सुरुवातीला पटलं नव्हतं तर अजूनही काहींना पटत नाही. मात्र बिग बॉस मराठी ५ चा स्पर्धक धनंजय पोवार उर्फ डीपी दादाचं अनुश्रीबद्दलचं मत आता बदललं आहे. काय म्हणाला धनंजय पोवार?
धनंजय पोवार इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "अनुश्री मानेबद्दल मी मागे बोललो होतो की मला हिचा गेम अजिबात आवडलेला नाही. तिचं बोलणं, तिचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. पण गेल्या १०-१२ दिवसांमध्ये अनुश्रीने दाखवून दिलं की तिला किती गेम कळाला आहे. आत्ता या घरात दोन असे स्पर्धक आहेत जे बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वत:चे निर्णय स्वत: घेत आहेत ते म्हणजे विशाल आणि अनुश्री. तुम्ही अनुश्रीला बाहेर काढू शकत नाही...भाई, चालता बोलता कंटेंट आहे. त्या राखीला अजून थोडे दिवस ठेवा. राखीला सुद्धा अनुश्री माने खाऊन टाकेल, गिळून टाकेल. चर्चाच नाही..."
या आठवड्यात राखी सावंत घरात मनोरंजन करायला आली आहे. अनुश्री राखीलाही पुरुन उरत आहे. तिला उलट उत्तर देऊन भिडत आहे. यामुळे सध्या तिचे चाहतेही तिचं कौतुक करताना थकत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी अनुश्रीने राकेश बापटवर आरोप केला होता. परवानगी न घेता हात लावल्याचा गंभीर आरोप तिने केला ज्यावरुन अनेकांनी तिला विरोध केला. रितेशनेही अनुश्रीला अनेकदा भाऊच्या धक्क्यावर सुनावलं होतं.
बिग बॉसमध्ये या आठवड्यात सहा स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. राकेश बापट, करण सोनावणे, सचिन कुमावत, प्रभू शेळके. आयुष संजीव आणि प्राजक्ता शुक्रे या स्पर्धकांचा समावेश आहे. आता या आठवड्यात कोण बाहेर जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
अनुश्री माने ही सातारा जिल्ह्यातील वाई येथील आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, क्रिएटर आहे. याआधी अनुश्री 'चल भावा सिटीत' या रिएलिटी शोमध्येही दिसली होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या अफेअरचीही सोशल मीडियावर चर्चा होती. बहिणीच्या दीरासोबत तिचं रिलेशनशिप होतं. तो तिच्याहून बराच मोठा होता. दोघांचे रोमँटिक., कॉमेडी रील्स सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. आता अनुश्री बिग बॉसमधून प्रसिद्धीझोतात आली आहे.
Web Summary : Dhananjay Powar praises Anushree Mane's improved game in Bigg Boss Marathi 6, calling her a 'content creator'. He believes only Anushree and Vishal make smart decisions. Anushree's past controversies and current clashes with Rakhi Sawant are highlighted, alongside her nomination status.
Web Summary : धनंजय पवार ने बिग बॉस मराठी 6 में अनुश्री माने के बेहतर खेल की प्रशंसा की, उन्हें 'कंटेंट क्रिएटर' कहा। उनका मानना है कि केवल अनुश्री और विशाल ही समझदारी से फैसले लेते हैं। अनुश्री के पिछले विवादों और राखी सावंत के साथ मौजूदा टकराव को उजागर किया गया है, साथ ही उनकी नामांकन स्थिति भी बताई गई है।