'बिग बॉस मराठी ६'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. गेल्या आठवड्यात लावणी डान्सर राधा पाटील 'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर गेली. आता या आठवड्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. या आठवड्यात घराबाहेर गेलेल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. जे वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
बिग बॉस मराठी ६ मध्ये या आठवड्यात एकूण ८ स्पर्धक नॉमिनेट आहेत. सोनाली राऊत, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, रुचिता जामदार, दीपाली सय्यद ओमकार राऊत, विशाल कोटियन आणि प्रभू शेळके... हे ८ स्पर्धक नॉमिनेट आहेत. यापैकी सोनाली राऊत 'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर गेली, अशी चर्चा आहे. अर्थात याविषयी अधिकृत खुलासा उद्या रविवारच्या एपिसोडमध्ये होईलच.
कोण आहे सोनाली राऊत?
'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेली सोनाली राऊत ही अभिनेत्री असून तिने बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. ग्रेट ग्रँड मस्ती, द एक्सपोज या सिनेमांमध्ये सोनाली झळकली. इतकंच नव्हे सोनालीने ग्रेट ग्रँड मस्ती सिनेमात रितेश देशमुखसोबत काम केलं. सोनाली या नव्या सीझनमध्ये तिच्या ग्लॅमरचा तडका नक्कीच लावेल अशी शक्यता होती. परंतु सुरुवातीपासून घरात भांडणं लावणं, कोणतंही काम न करणं यामुळे सोनाली राऊत चर्चेत असायची. शेणाचं घर की मेणाचं घर या टास्कमध्ये सोनाली राऊतने टास्क खेळण्यास नकार दिल्याने तिला बिग बॉसने या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे स्वतःच्या स्वभावामुळे सोनाली राऊत घराबाहेर गेली, अशी चर्चा आहे. आता उद्याच्या रविवारच्या एपिसोडमध्ये सोनाली खरंच घराबाहेर गेली का, याचा उलगडा होईल.
Web Summary : Bigg Boss Marathi 6 sees Sonali Raut's potential eviction due to her behavior. Nominated for refusing a task, her argumentative nature may have led to her departure. Official confirmation awaits Sunday's episode.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में सोनाली राउत का व्यवहार उन्हें बाहर कर सकता है। एक कार्य से इनकार करने के लिए नामांकित, उनके झगड़ालू स्वभाव के कारण उन्हें बाहर जाना पड़ सकता है। आधिकारिक पुष्टि रविवार के एपिसोड में होगी।