Join us
Daily Top 2Weekly Top 5

"किती फालतुगिरी करते...", सुरेखा कुडची निक्कीवर संतापल्या; पोस्ट शेअर करत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 09:39 IST

'बिग बॉस' मराठीचा सहावा आठवड्यातही निक्कीचा मनमानी कारभार सुरू आहे.

 'बिग बॉस'च्या घरात पहिल्याच दिवसापासून निक्की तांबोळीची चर्चा सुरू आहे.  'बिग बॉस' मराठीचा सहावा आठवड्यातही निक्कीचा मनमानी कारभार सुरू आहे. या आठवड्यात नॉमिनेट झाल्यानंतर निक्की घरातील नियम मोडताना दिसत आहे. निक्कीच्या वागणुकीवर आता अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर करत लिहलं,"ही निक्की कालच्या एपिसोडपासून डोक्यात गेलीच होती आज तर कहरच केला. गेममध्ये किती फालतुगिरी करते… चौकटीच्या बाहेर जायचं नव्हतं तरी गेली आणि गेम थांबवावा लागला. बरं दुसरं कोणी सांगायला जातं तर ऐकून पण घ्यायचं नाही. स्वत:चंच खरं करायचं. बघावं तेव्हा त्या अरबाजच्या अंगावर पाय टाकून बसलेली असते. असो आपण कितीही बोंबललो तरी 'बिग बॉस' निक्कीला ना शिक्षा करणार, ना बाहेर काढणार…कंटेंट देतेय ना… शी शी लाज काढलीये या बाईईईने", या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

सध्या 'बिग बॉस'च्या घरात वर्षा उसगांवकर या कॅप्टन आहेत. पण, निक्की काही त्यांचं ऐकताना दिसून येत नाहीये. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये 'मी कोणतीही ड्युटी करणार नाहीये' असं निक्की म्हणाताना दिसून येते. म्हणते. त्यावर वर्षा ताई म्हणतात, 'अशी तू मनमानी नाही करू शकत इथे' निक्की गार्डन एरियातील सोफ्यावर झोपली आहे. अवेळी झोपल्यामुळे आणि बिग बॉसच्या घरातील नियमांच पालन न केल्यामुळे बिग बॉस 'कुक्डकू'चा गजर वाजवतात. तरी निक्की उठत नाही.  त्यामुले नियमांचं पालन न केल्यामुळे 'बिग बॉस' कोणता निर्णय घेतील? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, 'बिग बॉस' या आठवड्यात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, घनःश्याम दरोडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कोणत्या सदस्याचा प्रवास इथेच संपेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.  'बिग बॉस मराठी'च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत.     

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटी