Join us

Bigg Boss Marathi 5 : घरातील कामांवरुन निक्की विरुद्ध घर, काय होणार आजच्या भागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 17:24 IST

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आजच्या भागातही प्रेक्षकांना सैरभैर झालेली निक्की पाहायला मिळणार आहे. आज घरातील कामांवरुन निक्की विरुद्ध घर उभे असलेले पाहायला मिळेल.

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. पण या सीझनमधील एका जोडीने मात्र प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. ही जोडी म्हणजे निक्की आणि अरबाज. आता 'बिग बॉस मराठी'च्या घरातील अरबाजचा प्रवास संपला आहे. अरबाजचा प्रवास संपल्याने निक्की मात्र खूव भावूक झालेली पाहायला मिळत आहे.  तिने संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होते. आजच्या भागातही प्रेक्षकांना सैरभैर झालेली निक्की पाहायला मिळणार आहे. आज घरातील कामांवरुन निक्की विरुद्ध घर उभे असलेले पाहायला मिळेल. 

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात पॅडी म्हणतोय,"ठरलंय ना ती तिचं तिचं काम करणार. जेवण पण ती तिचं तिचं बनवेल". त्यावर निक्की म्हणते,"हे तुम्ही ठरवलं आहे... तिने नाही ठरवलं. तिचं मत वेगळं आहे.. तुमचं मत वेगळं आहे". त्यावर डीपी दादा म्हणतात,"आपल्या घरात एक व्यक्ती असते जी कमवत नसते फक्त खात असते. त्याला रात्री कधी रडताना पाहिलं आहे का?".   

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात जान्हवी, अंकिता आणि सूरज एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत. जान्हवी सूरज आणि अंकिताला विचारतेय,"तुमची काल चर्चा झाली का जान्हवीसोबत जे असतात ते बाहेर जातात.. ती अनलकी आहे". त्यावर पॅडी दादा म्हणतात,"अरबाज आम्हाला येऊन असं सांगत होता. वैभव तुझ्यासोबत होता तो बाहेर गेला, आर्या, संग्राम तुझ्यासोबत होते ते बाहेर गेले". 

टॅग्स :बिग बॉस मराठी