Join us

Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 19:47 IST

रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा अन् झक्कास प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय (bigg boss marathi 5, riteish deshmukh)

 काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोमध्ये यंदाचा सीझनचं होस्टिंग महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख करणार असल्याचा खुलासा झालाय. अशातच 'बिग बॉस मराठी ५' नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे. नव्या प्रोमोत रितेशचा झक्कास अंदाज दिसतोय. 

 'बिग बॉस मराठी ५' चा नवीन प्रोमो आऊट

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊची 'लयभारी' स्टाईल पाहायला मिळाली. अन् आता नव्या प्रोमोमध्येही त्याचा कमाल स्वॅग पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील स्पर्धकांना खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश भाऊ सज्ज आहे. प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय,"तंटा नाय तर घंटा नाय... ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय कल्ला तर होणारच... तो पण माझ्या स्टाईलने"  अशाप्रकारे रितेशचा भन्नाट अंदाज पाहायला मिळतोय.

 'बिग बॉस मराठी ५'  लवकरच

महाराष्ट्रात लवकरच 'बिग बॉस'चा आवाज घुमणार आहे. आगळावेगळा भन्नाट रिअॅलिटी शो म्हणून 'BIGG BOSS'कडे पाहिलं जातं. हा कार्यक्रम जेवढा मनोरंजक आहे तेवढाच आव्हानात्मक आहे. या पर्वातही एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक अशक्य, अफलातून गोष्टी करताना दिसून येतील. तसेच रितेश भाऊ आपल्या अनोख्या अंदाजात यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. 'बिग बॉस' मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि JioCinema वर पाहता येईल.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखबिग बॉसकलर्स मराठी