Join us

"सिनेमा पाहून भाष्य करा, न पाहता...", सूरजसाठी धावून आली अंकिता; ट्रोलर्सना म्हणाली-"त्याच्याकडून एखादी गोष्ट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:09 IST

"इन्फ्लुएन्सर आणि कलाकारांमधे एक दरी आहेच, पण...", सूरजसाठी धावून आली अंकिता; ट्रोलर्सना म्हणाली...

Ankita Walwalkar Post: केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'झापुक झुपूक' हा चित्रपट  २५ एप्रिल २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला  प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटामुळे सूरज चव्हाणला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला. याबाबत अलिकडेच इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये  'झापुक झुपूक'वर अनेकजण ठरवून नकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचा दावा केदार शिंदेंनी केला होता. त्यात आता सूरजला पाठिंबा देण्यासाठी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर पुढे सरसावली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर सूरज चव्हाणला पाठिंबा देणारी पोस्ट शेअर केली आहे. 

अंकिताने सोशल मीडियावर सूरज चव्हाणसोबत फोटो शेअर करुन खास पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने लिहिलंय, "सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट बघितला. मी आत्तापर्यंत ३-४ वेळा बघितला. खरंतर मी आत्ता सोशल मीडियावर गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छिते की सुरज फक्त गरीब आहे म्हणून आज त्या जागेवर नाहीये, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा मुलगा, त्याने जे काम केलंय ना ते खरोखर कौतुकास पात्र आहे. त्याच्याकडून एखादी गोष्ट करून घेण्यात जास्त मेहनत आहे हे मला माहीत आहे. कारण ७० दिवस x २४ तास एकत्र राहीलोय, तुम्ही तर एडिटेड बिग बॉस बघितलाय. जेव्हा बिग बॉस नी दिलेल्या निकषांच्या आधारावर मी सूरजला बाद करत होते तेव्हा मला जज केल गेलं. पण उद्देश तोच होता की त्याने त्याच्या गोष्टी सुधाराव्यात त्याला कळणं गरजेच होतं की तो कुठे मागे पडतोय. त्यामुळे त्याच्याकडून चित्रपटासाठी आउटपुट काढून घेणाऱ्या केदार सरांचं आणि टीमचं खूप कौतुक…!"

पुढे अंकिताने लिहिलंय, "मी आधी पण बोलले होते की इंडस्ट्रीमधे इफ्लूएन्सर क्रिएटर आणि कलाकारांमधे एक दरी आहेच, पण कलाकाराला जसं जात धर्म नसतो तसंच त्याला हे प्रेम सहानुभूतीपूर्वक मिळालं असं म्हणू पाहणाऱ्यांनी त्याच कलाकार म्हणून काम पण पहावं. सिनेमा पाहून त्यावर भाष्य करा न पाहता टीका करू नका. या चित्रपटाला प्रतिसाद कमी मिळाला तर त्याच हे ही कारण की सूरजचे फॅन्स गावाकडे आणि गावांमध्ये चित्रपटगृह नाहीत, काहींच म्हणणं होत की त्याला ग्रुम करून चित्रपट बनवला पाहिजे होता पण तशी इच्छा सूरजची पण हवी ना? म्हणून सूरज चव्हाण हे पात्र आहे तसंच present केल गेलंय. त्याने जे काम केलंय त्यावर आपण भाष्य करूया.. त्या मुलाने या चित्रपटात क्षमतेपेक्षा सुंदर काम केलय…आपण चित्रपटांकडे चित्रपट म्हणूनच बघायला शिकूया! जर महाराष्ट्रानेच सूरजला जिंकवलंय तर महाराष्ट्र हा चित्रपट डोक्यावर घेईलंच…” आख्याना “ माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...!" असं म्हणत अंकिताने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरटिव्ही कलाकारसिनेमासोशल मीडिया