Join us
Daily Top 2Weekly Top 5

हरिनामाचा गजर अन् फुलांचा वर्षाव; 'बिग बॉस'मधून बाहेर आलेल्या पुरुषोत्तम दादांचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 13:01 IST

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून बाहेर आलेले पहिले स्पर्धक किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचं त्यांच्या गावी जोरदार स्वागत करण्यात आलंय (purushottam dada patil, bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये रविवारी पहिलं एलिमिनेशन झालं. या एलिमिनेशनमध्ये घरातील किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांना घराबाहेर जावं लागलं. रामकृष्ण हरीचा जयघोष करत किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला. बिग बॉसच्या इतिहासातील असा खेळाडू जो सन्मानाने आणि स्वाभिमानाने बाहेर पडला म्हणून पुरुषोत्तम दादा पाटील यांचं कौतुक होतंय. अशातच बिग बॉसच्या बाहेर आल्यावर गावी गेल्यावर पुरुषोत्तम दादा पाटील यांचं गावी जंगी स्वागत करण्यात आलं. 

पुरुषोत्तम दादा पाटील यांचं गावी जोरदार स्वागत

पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओत पुरुषोत्तम दादा पाटील यांची गाडीतून गावी एन्ट्री होते. लहान टाळकरी मुलं टाळ मृदुंगाच्या साथीने हरिनामाचा जयघोष करत पुरुषोत्तम दादा यांचं स्वागत करतात. पुढे एका पाटावर उभं राहून पुरुषोत्तम यांना महिलांकडून औक्षण केलं जातं. पुढे त्यांच्यावर फुलांच्या पायघड्या दिसत असून त्यांच्यावर फुलांची उधळण होते. मंदिरात जाऊन पुरुषोत्तम दादा पांडुरंगाचं मनोभावे दर्शन घेतात.

पुरुषोत्तम यांनी सर्वांची मनं जिंकली

पुरुषोत्तम दादा पाटील गावात आल्यावर त्यांनी सर्वांसमोर भाषणही केलेलं दिसलं. याशिवाय सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार केला. अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट करुन 'पुरुषोत्तम यांनी खेळ नाही पण मनं जिंकली'. याशिवाय बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये असलेल्या योगिता चव्हाण हिचा पती अभिनेता सौरभ चव्हाणने कमेंटमध्ये लिहिलंय की, "दादा खूप छान खेळलात.. स्वाभिमाना पुढे काय मोठं.....!! लवकरच भेट होईल आपली आशी इच्छा देवा पुढे मांडतो..... राम कृष्ण हरी" अशाप्रकारे पुरुषोत्तम दादा पाटील यांचं गावात जंगी स्वागत झालंच शिवाय लोकांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

 

 

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीरितेश देशमुख