Join us

Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरात टास्क दरम्यान होणार तुफान राडा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:46 IST

Bigg Boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज टास्क दरम्यान तुफान राडा होणार आहेत.

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची क्रेझ आता कमी झाली आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा कार्यक्रम मागे पडला आहे.. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज टास्क दरम्यान तुफान राडे होणार आहेत. 

कोण खरं आणि कोण खोटं वागतंय यावरून रुचिरा जरा अशांत झाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये असं दिसतं आहे कि, तेजुला किरण माने सांगत आहेत तिकीट कुठे लपवलं आहे. त्यावरून अक्षय किरण मानेला बजावून सांगताना दिसणार आहेत सांगू नका... चुकीचं आहे. 

रुचिराने देखील किरण मानेंना जाब विचारला तुम्हांला तेजस्विनीवर विश्वास नाहीये का? तेजस्विनीरुचिराला म्हणाली, आऊट झाली आहे म्हणून रडते. रुचिरा म्हणाली, कोण खरं खेळतं आहे आणि कोण खोटं ते प्रेक्षक ठरवतील... जेव्हा खोटं दिसेल तेव्हा रुचिरा अशांत होणार... तेजस्विनी रुचिराला विचारताना दिसणार आहे, झालं फुटेज घेऊन ? आता पुढं नेमकं काय घडतं ते आजच्या भागात कळेल. 

टॅग्स :बिग बॉस मराठी