बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4 ) अंतिम टप्प्यात पोहचला आहे. नवीन वर्षात ८ जानेवारीला चौथ्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. ग्रँड फिनालेची घोषणा होताच तेजस्विनी लोणारी(Tejaswini Lonari)च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे. शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे, त्यात तेजस्विनी बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे.
पब्लिक विनर सर्वांची लाडकी तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्यानं घराबाहेर आली. तिचं अचानक घराबाहेर पडणं कोणाला पटलं नाही.पण शारिरीक कारणामुळे तिला नाईलाजानं घराबाहेर पडावं लागलं. पण आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे.
कलर्स मराठीचा एक प्रोमो नुकताच समोर आला त्यात घराच्या सदस्यांनी तेजूचं जोरदार स्वागत केलं.तिला पाहून सगळे सदस्य फारच आनंदी झाले. खास करून अमृता धोंगडे आणि किरण माने हे तेजुला पाहून खुश झाले.आता तेजू शेवटच्या आठवड्यात घर गाजवताना दिसणार आहे. पण तिला विजेतेपद पटकावण्याची संधी मिळणार या याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान तेजस्विनीसह आज बिग बॉसच्या घरात पहिल्या सीझनची स्पर्धक स्मिता गोंदकर, दुसऱ्या सीझनची नेहा शितोळे आणि तिसऱ्या सीझनचा उत्कर्ष शिंदे यांनीदेखील एन्ट्री केली आहे.