Join us

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस'च्या घरातून प्रसाद जवादे बाहेर, मांजरेकर म्हणाले...यंदाच्या पर्वातील सर्वात मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 22:47 IST

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा आता शेवटचा आठवडा सुरू असून आज घरातून प्रसाद जवादे घराबाहेर पडला आहे.

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा आता शेवटचा आठवडा सुरू असून आज घरातून प्रसाद जवादे घराबाहेर पडला आहे. 'फिनाले विक'च्या नॉमिनेशनमध्ये प्रसादसोबत अमृता धोंगडे आणि राखी सावंत नॉमिनेटेड होते. यात प्रसादचा प्रवास आज संपला असून तो घराबाहेर पडला आहे. प्रसाद जवादेचं नाव घोषीत करताना सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही यंदाच्या पर्वातील हा मला सर्वात मोठा धक्का वाटत असल्याचं म्हटलं. तसंच प्रसाद टॉप-५ चा नक्कीच दावेदार होता असंही मांजरेकर म्हणाले.

'बिग बॉस'च्या घरात आता किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, आरोह वेलणकर यांच्यात शेवटच्या आठवड्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे. अपूर्वा नेमळेकर ही याआधीच फायनलमध्ये पोहोचली आहे. गेल्या आठवड्याच्या टास्कमध्ये 'तिकीट टू फिनाले' जिंकून अपूर्वा अंतिम स्पर्धकांमध्ये पोहोचणारी पहिली स्पर्धक आहे. 

प्रसाद जवादे खरंतर यंदाच्या पर्वातील सर्वाधिक नॉमिनेटेड झालेला सदस्य आहे. प्रत्येकवेळी प्रेक्षकांनी प्रसाद जवादेवर विश्वास दाखवत त्याला संधी दिली होती. आजवर प्रत्येक नॉमिनेशनमधून प्रसाद सेफ होत आला होता. पण अखेरच्या आठवड्यात प्रसादला धक्का मिळाला. खरंतर या आठवड्यातही प्रसाद नॉमिनेशनला आल्यानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा त्याला सेफ करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. यावेळी मात्र प्रसादला साथ मिळू शकली नाही आणि अखेरच्या टप्प्यात येऊन प्रसाद घराबाहेर पडला आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी