Join us

Bigg Boss Marathi 4, Day 19 : बिग बॉसच्या घरात त्रिशुल - योगेश आले आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 08:49 IST

Bigg Boss Marathi 4: घराघरात दररोज नवीन वाद, भांडणं, मैत्री आणि रुसवे फुगवे पाहायला मिळतात. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर वाजवा रे वाजवा कॅप्टन्सी कार्य सोपवले

---छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा यंदा चौथा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसच्या घरात सदस्यांना दाखल होऊन १८ दिवस उलटले आहेत. आता हा शो रंजक वळणावर आला आहे. घराघरात दररोज नवीन वाद, भांडणं, मैत्री आणि रुसवे फुगवे पाहायला मिळतात. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर वाजवा रे वाजवा कॅप्टन्सी कार्य सोपवले

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  "वाजवा रे वाजवा" कार्य दरम्यान मिळालेल्या ब्रेक मध्ये सदस्यांमध्ये सुरु आहे चर्चा आणि बनवत आहेत स्ट्रॅटेजि कसं आपल्याला जिंकता येईल आणि कोणाच्या विरोधात कोणाला पाठवायचे.   पण इतक्या वेळ तर अक्षयने विचारले योगेशच्या विरोधात कोण खेळणार ? मेघा ताई आणि समृद्धी असे म्हंटले असता अक्षय म्हणाला नाही चूक त्रिशूलला पाठवूया. अपूर्वा या निर्णयावर सहमत झाली म्हणजे योगेशच्या विरोधात त्रिशूल आणि ताई खेळणार आपल्याकडून. 

तेजस्विनीच्या टीममध्ये देखील याचविषयी सुरु असताना योगेश म्हणाला, त्रिशूल, अक्षय. मुलगा किंवा मुलगी कोणी येऊ देत मी नाही बघणार पुढे कोण आहे. पुढे कार्यात त्रिशुल - योगेश आमनेसामने येणार आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीअपूर्वा नेमळेकर