Join us

Bigg Boss Marathi 4, Day 14 : बिग बॉसच्या घरात किरण माने म्हणाला-आम्ही वेगळे झालो तर त्यांना नॉमिनेट पण करू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 15:09 IST

आज घरामध्ये १४ व्या दिवशी “फटा पोश्टर निकाला झिरो” हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार ? आणि कोणाला सेफ ? हे लवकरच कळेल.

आज घरामध्ये १४ व्या दिवशी “फटा पोश्टर निकाला झिरो” हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार ? आणि कोणाला सेफ ? कोण घराबाहेर जाईल ? हे कळेल लवकरच. यादरम्यान यशश्री अमृता देशमुखला नॉमिनेट करणार असून त्यावर दोघींमध्ये कडाक्याचे भांडणं देखील होणार आहे.

तर दुसरीकडे  घरामध्ये विकास, किरण माने एका विषयावर चर्चा करत असताना योगेश विकासला सल्ला देताना दिसणार आहे "बिग बॉसछाया घरात कुजबुज करण्यास सक्त मनाई आहे" विकास त्यावर योगेशला म्हणाला "हे सगळ्यात जास्त तुलाच शोभतं आहे. किरण माने यांना योगेशने विचारले काय म्हणणं आहे ? त्यावर ते म्हणाले, “तुला बोलो कि फिक्स आहे तो नाही पाहिजे.

 तुझ्या बरोबर जे आहेत त्यांचे तू सांभाळ, तो नाही पाहिजे. तू काय ते सांगायची वाट बघतो आहे आम्ही... तुझी घुसमट झाली आहे, बॉण्ड मध्ये अडकला आहे तू. गंमत करतो आहे मी, नाही करू शकतं का? चेष्टा पण करायची मुश्किल झाली आहे इथे.आम्ही वेगळे झालो तर त्यांना नॉमिनेट पण करू, आम्ही त्यांच्याबरोबर नाही हे लक्षात ठेव. विकास त्यावर म्हणाला, "तो इथे पण बोलतो आणि तिथे पण बोलतो, तुझं तोंड उघडतं नाही लवकर. या चर्चेनंतर आता हे कोणाला नॉमिनेट करणार हे बघूया आजच्या भागामध्ये.  

टॅग्स :बिग बॉस मराठी