Join us

Bigg Boss Marathi 4, Day 12:Bigg Boss Marathi 4, Day 12: जेवण बनवण्यावरून BFF अमृता आणि तेजस्विनीमध्ये कडाक्याचं भांडण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 14:27 IST

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये पडणार वादाची पहिली ठिणगी, कारण काय तर जेवण बनवणे.

बिग बॉसच्या घरात भांडण, मैत्री आणि रुसवे फुगवे रोज होत असतात. एकमेकांचे विरोधक असलेल्यांमध्ये मैत्री जमते तर घट्ट मैत्री असणाऱ्यांमध्ये वाद होतात. आज दोन चांगल्या मैत्रीणींमध्ये भांडण होताना दिसणार आहेत. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये पडणार वादाची पहिली ठिणगी, कारण काय तर जेवण बनवणे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये डिसऑन येत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली आहे. 

 याच वरून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. तेजस्विनी तू आता काय करते आहेस ? त्यावर तेजस्विनी म्हणाली, "तू जेवणावर काढतेस आहेस मी बनवणार नाही हि पध्द्त नव्हे त्यावर अमृताचा पारा चढला "हो हीच पद्धत आहे आता" असे अमृताने तेजस्विनीला ठणकावून सांगितले.

 तेजस्विनीचे म्हणणे आहे, "अरे रा वीची भाषा नको करुस, हाय वे माय वे मला नाही चालतं." अमृता स्वतःशी बोलताना म्हणाली, "सगळ्यांचीच मनधरणी करायला आली आहे मी." घरामध्ये झाल्या प्रकारामुळे अमृताला अश्रू अनावर झाले. बघूया आजच्या भागामध्ये या दोघींमधील भांडणं मिटेल कि अजूनच वाढेल? बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडतंय ते. 

टॅग्स :बिग बॉस मराठी