Join us

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात स्नेहलताशी बोलताना अपूर्वा झाली भावूक, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 15:55 IST

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहलता आणि अपूर्वाची मैत्री हळूहळू घट्ट होत आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहलता आणि अपूर्वाची मैत्री हळूहळू घट्ट होत आहे. खेळा व्यतिरिक्त देखील त्या दोघी एकमेकींशी बऱ्याच गोष्टी शेअर करताना दिसतात. आज अपूर्वा स्नेहलताशी बोलताना दिसणार आहे. गेल्या पाच वर्षात तिच्यात झालेले बदल स्नेहलताला सांगताना ती भावूक होणार आहे. असं नक्की झालं घरात ज्यामुळे ती भावूक झाली. 

अपूर्वा म्हणाली, दोन वेगळा दृष्टीकोन असलेल्या व्यक्ती मला एकाच दिवशी भेटल्या या घरात. म्हणजे उदाहरणार्थ मीरा भेटली जी मला म्हणाली, मला तू माझ्यासारखी वाटतेस… जे मनात आहे, जे डोक्यात आलं ते तू तोंडावर बोलतेस आणि मोकळी होतेस. तिने कौतुक केलं आणि हा व्यक्ती म्हणतो आहे (आरोह) तेच मला नाही आवडलं. तर हा  दृष्टीकोनचा भाग आहे, तू मला माझा मूळ स्वभाव बदलायला सांगतो आहेस इतकं नाहीना होऊ शकतं.

 एखादी व्यक्ती एका एखाद्या परिस्थिती रिऍक्ट करते त्याचा अर्थ काहीतरी असं असेल कि हि व्यक्ती दरवेळा अशी का रिऍक्ट करते. काही लोक जी मला पाच वर्ष आधी भेटली आहेत त्यांना धक्का बसला असेल मला असं बघून कि अपूर्वा अशी रिऍक्ट करते? आता नक्की काय घडलं ज्यामुळे हे संभाषण सुरु झालं ? हे आपल्याला आजच्या भागामध्ये कळेल.  

टॅग्स :बिग बॉस मराठीअपूर्वा नेमळेकर