Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 4: अनिकेत विश्वासराव एक्स पत्नीसोबत दिसणार बिग बॉसच्या घरात? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:29 IST

Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)चा चौथा सीझन २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस सुत्रसंचालन अभिनेते महेश मांजरेकर करणार आहेत. मात्र यंदा कोणकोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बिग बॉसमध्ये वादग्रस्त आणि जास्त चर्चेत आलेल्या व्यक्तींना विशेष करुन प्राधान्य दिले जाते. मागील तीन सीझनमध्ये देखील अनेक कॉन्ट्रोवर्शिअल व्यक्ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून पाहायला मिळाले होते. चौथ्या पर्वात अशाच एका वादग्रस्त अभिनेत्याचे नाव समोर येत आहे.

अभिनेता अनिकेत विश्वासरावबिग बॉस मराठी ४च्या घरात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अनिकेत एकटाच नाही तर त्याची एक्स पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण देखील बिग बॉसच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी हे कपल खूप चर्चेत आले होते. दोघांनी विभक्त व्हायचे ठरवल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण अभिनेत्री स्नेहा चव्हाणनेअनिकेत विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करत दोघांवर गंभीर आरोप केले होते. मात्र याबाबत अनिकेतने कोणताही खुलासा केला नव्हता. पण आता ते दोघे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांची भांडणं अनेकांना माहिती आहेत. त्यामुळे ते दोघे बिग बॉसच्या घरात एकत्र येण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला नवरा आविष्कार दार्व्हेकर सहभागी झाले होते. त्याच्या नात्यातील ट्विस्टमुळे शो चांगलाच हिट झाला होता.

टॅग्स :अनिकेत विश्वासरावस्नेहा चव्हाणबिग बॉस मराठी