Join us

Bigg Boss Marathi 3: एका आठवड्यानंतर हा सदस्य पडला बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 22:34 IST

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगते आहे.

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगते आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील सदस्यांना देखील प्रेक्षकांचे भभरून प्रेम मिळते आहे. बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांचे खूप जवळच नाते आहे. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. दरम्यान आता शो सुरू होऊन एक आठवडा उलटला नाही आणि घरातील एक सदस्य काही कारणास्तव घराबाहेर पडल्याचे समजते आहे. 

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावे जास्त चर्चेत आली. ती म्हणजे  तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित केले. नुकतेच शिवलीला यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले की,इथला प्रत्येक माणूस माझा असेल. त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरच प्रेक्षकांची मनेदेखील जिंकली.

पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आणि आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावे लागले. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहतील.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील चर्चित १५ कलाकार या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे. आता शिवलीला बऱ्या होऊन पुन्हा कधी बिग बॉसच्या घरात परतणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी