Join us

Bigg Boss Marathi 3 Update: मीनल- विशालची विकासवरुन चर्चा, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:58 IST

Bigg Boss Marathi 3: घरातील सदस्यांची नाती दर दिवसाला बदलत आहेत. कोणजाणे उद्या गायत्री, मीरा आणि जयमधील अबोला देखील दूर होईल.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विशाल आणि मीनलची आज चर्चा बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये ते कॅप्टन्सी टास्क आणि विकासबद्दल बोलताना दिसणार आहेत. घरातील सदस्यांची नाती दर दिवसाला बदलत आहेत. कोणजाणे उद्या गायत्री, मीरा आणि जयमधील अबोला देखील दूर होईल. या घरात एकमेकांची साथ ही लागतेच मग ते कार्य असो व टास्क असो.विशाल मीनलला सांगताना दिसणार आहे, कॅप्टन्सी टास्कविषयी काय बोलत होती... की तू स्वत:साठी खेळ दुसर्‍यांसाठी नाही... आता बघ.

 मी विकासला हाच प्रश्न विचारला. कदाचित त्याला तसं वाटलं असेल, चॅनलने तसं सांगितलं की कॅप्टन्सी मला द्या मला द्या म्हणू नका... मी त्याला बोललो काय मला समजलं नाही, मला असं वाटलं की ती म्हणत होती कॅप्टन मला बनवा म्हणून तिकडे जाऊ नका म्हणून, ग्रुपमध्ये खेळताय तुम्ही एकमेकांसाठी खेळा, एकमेकांना बनवा... मी कधीतरी गेलो आहे का मला सांग? कधीचं नाही गेलो. हे त्यातून मला त्यात घेऊन चालला आहे.मग म्हंटल याला नको पुढचं विचारायला. हा मला एकाच दुसरं करून सांगणार.

विशाल विकासला विचारताना दिसणार आहे, तू मला नॉमिनेट का करायला गेला होतास जयकडे ? विकास त्यावर म्हणाला, कारणं तू मला नॉमिनेट करणार होतास. विशाल म्हणाला, मी तुझं नावं सुध्दा घेतलं नाही. त्यावर विकास म्हणाला, मला जयने सांगितले. मीनल म्हणाली, खोटं बोलतो. विशाल म्हणाला, खोटं बोलायला कुठल्या शाळेत. विकास म्हणाला, त्याविषयी आपण बोलूया कॅमेरा ऑफ होऊ देत. 

विशाल म्हणाला, त्यानंतर जयने बॉम्ब टाकला तो मला नॉमिनेट करायला आला. भाऊ बोलायलाचं आला नाही परत. त्यावर विकास म्हणाला, आम्ही तीन दिवस वाट बघत होतो तू येशील आमच्याकडे सॉरी बोलायला. विकासचे म्हणणे आहे, इथून पुढचा गेम अवघड होत जाणार आहे, तर कोणालाही नॉमिनेट करा मला नॉमिनेट करू नका.हे ऐकताच सगळ्यांना हसू फुटले.

टॅग्स :बिग बॉस मराठी