Join us  

Bigg Boss Marathi 3: आजपासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा धमाका; असं असेल यंदाचं पर्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 2:47 PM

Bigg Boss Marathi 3: प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) प्रत्येक पर्वाप्रमाणे याही पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहेत.

ठळक मुद्देकसं असेल यंदाचं 'बिग बॉस मराठी ३'चं नवं पर्व?

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या (Karan Johar)  'बिग बॉस ओटीटी'ने (Bigg Boss OTT)  प्रेक्षकांचा निरोप घेतला. हा शो संपत असतानाच सलमान खानचा (salman khan) 'बिग बॉस १५' ((Bigg Boss 15)  देखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. त्यातच आता मराठी प्रेक्षकांसाठीदेखील आनंदाची बातमी आहे. हिंदी 'बिग बॉस'प्रमाणेच 'बिग बॉस मराठी ३' देखील (Bigg Boss Marathi 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) प्रत्येक पर्वाप्रमाणे याही पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहेत. म्हणूनच, प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्याचसाठी 'बिग बॉस मराठी ३'चं हे नवं पर्व नेमकं कसं असेल ते पाहुयात.

दरवेळेप्रमाणे यंदाच्याही पर्वात बिग बॉसच्या घरात १५ सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात तब्बल १०० दिवस एकत्र रहावं लागणार आहे. आज (१९ सप्टेंबर) संध्याकाळी कलर्स मराठीवर या शोचा ग्रॅड प्रिमियर होणार आहे. तसंच वूटवरदेखील याचं लाइव्ह स्ट्रीमिंग केलं जाणार आहे.

रवी जाधवच्या पत्नीपुढे अभिनेत्रीही फेल; पाहा मेघना जाधवचे झक्कास फोटो

प्रेक्षकांनाही मिळणार संधी

यंदाच्या पर्वात प्रेक्षकांना मत देण्यासोबतच घरातील स्पर्धकांशी संवाद साधता येणार आहे. तुमचा प्रश्नच्या माध्यमातून प्रेक्षक स्पर्धकांना काही प्रश्न विचारु शकतात. तर चुगली बुथवरुन ते आपल्या आवडत्या स्पर्धकाशी संवाद साधू शकतात.

Bigg Boss15:१४ आठवड्यांसाठी सलमानने घेतलं इतकं मानधन; आकडा ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील 

कर्करोगावर मात करत महेश मांजरेकर सूत्रसंचालनासाठी पुन्हा सज्ज

महेश मांजरेकर यांना अलिकडेच ब्लड कॅन्सरचं निदान झालं असून नुकतीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी बिग बॉस मराठीचा प्रोमो शूट केला असून यावेळी त्यांनी त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. 

टॅग्स :बिग बॉसमहेश मांजरेकर टिव्ही कलाकारसिनेमा