Join us

Bigg Boss Marathi 3, Episodes, 13 Oct: मीराची 'मास्तर'गिरी; विद्यार्थ्यांना शिकवणार धडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 12:46 IST

Bigg boss marathi 3: बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा कॉलेजच भरणार आहे. यावेळी घरातील काही स्पर्धक शिक्षक तर काही विद्यार्थी होणार आहेत.

ठळक मुद्देBB College मध्ये मीरा, उत्कर्ष,आदिश, सुरेखा, सोनाली आणि दादुस हे शिक्षक असणार आहेत.

शाळा आणि कॉलेजचे दिवस प्रत्येकालाच प्रिय असतात. त्यामुळे या सुवर्ण काळातील आठवणी प्रत्येकाने त्याच्या मनातील कोपऱ्यात जपून ठेवल्या असतात. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धकाच्या या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. कारण, बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा कॉलेजच भरणार आहे. यावेळी घरातील काही स्पर्धक शिक्षक तर काही विद्यार्थी होणार आहेत. मात्र,यावेळीदेखील पुन्हा एकदा मीराची मास्तरगिरी पाहायला मिळते का आजच्या भागात समजणार आहे. 

या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरात “BB College” भरणार आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात काही स्पर्धक घरातील अन्य सदस्यांची शाळा घेणार आहेत. त्यामुळे मीराकडे आलेलं शिक्षक पद ती कशा पद्धतीने पार पाडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

'बिग बॉस'च्या घरात प्रेमाचे वारे; जय-स्नेहामध्ये निर्माण होतायेत प्रेमाचे बंध? 

हे आहेत BB Collegeचे विद्यार्थी

आविष्कार, स्नेहा, गायत्री, विशाल, विकास, जय, तृप्ती देसाई आणि मीनल हे BB College चे विद्यार्थी असणार आहेत.

हे आहेत BB College चे शिक्षक 

मीरा, उत्कर्ष, आदिश, सुरेखा, सोनाली आणि दादुस हे कॉलेजचे शिक्षक असणार आहेत. यावेळी आदिश वैद्य आज college मध्ये एक गुपित सांगताना दिसणार आहे. ज्यामुळे गायत्री दातार प्रचंड हसणार आहे. परंतु, दादूस, मीरा आणि उत्कर्ष त्यांची शिक्षकाची भूमिका कशी पार पाडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन