Join us

स्वत:ला बिग बॉस समजतेच का?; तृप्ती देसाई- मीरामध्ये पुन्हा एका वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:37 IST

Bigg boss marathi 3: एकीकडे घरात स्पर्धकांचे तीन नवे ग्रुप तयार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रुपमध्ये अन्य स्पर्धकांविषयी गॉसिप सुरु असतं.

ठळक मुद्देया दोघींचं भांडण पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे.

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3) पर्वाचा प्रत्येक भाग हळूहळू रंगत चालला आहे. बिग बॉस देत असलेले टास्क आणि ते जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये लागलेली चढाओढ यामुळे आता हे पर्व खऱ्या अर्थाने रंगू लागलं आहे. एकीकडे घरात स्पर्धकांचे तीन नवे ग्रुप तयार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रुपमध्ये अन्य स्पर्धकांविषयी गॉसिप सुरु असतं. तर दुसरीकडे अनेक स्पर्धकांचे एकमेकांसोबत मतभेद असल्यामुळे वाद रंगत आहेत. यामध्येच तृप्ती देसाई (Trupti Desai) आणि मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.  'तू स्वत:ला बिग बॉस समजतेस का?', असा थेट सवाल तृप्ती देसाईंनी मीराला विचारला आहे. 

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या घरातील एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये तृप्ती देसाई आणि मीरा यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचं दिसून येत आहे. यात मीराच्या दुटप्पी वागण्यामुळे तृप्ती देसाई संतापल्या आहेत.

अगं एका आठवड्यात तू किती शब्द फिरवतेस? तू स्वत:लाच बिग बॉस समजतेस का? इथे १४ जणं नाही, तर मी एकटीच खेळायला आली आहे, असं तुला वाटतं का?, असा प्रश्न तृप्ती देसाईंनी मीराला विचारला. त्यावर मीरानेदेखील त्यांच्यावर पलटवार केला आहे.  "म्हणते बायकांसाठी लढतेय, इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते ही बाई," असा टोमणा, मीराने तृप्ती देसाईंना मारला.

दोनदा संसार मोडल्यानंतर स्नेहा करत होती 'या' डान्सरला डेट?

दरम्यान, या दोघींचं भांडण पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. अनेकांनी मीराला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर, काहींनी तृप्ती देसाईंना खडे बोल सुनावले आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठी