Join us

Bigg Boss Marathi 3 : हे ‘मीरा जगन्नाथ हाऊस’ नाहीये..., महेश मांजरेकरांनी पुन्हा घेतली सदस्यांची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 11:12 IST

Bigg Boss Marathi 3 : काल शनिवारी रंगलेल्या स्पेशल एपिसोडमध्ये महेश मांजरेकर आले आणि त्यांनी अनेकांची खरडपट्टी काढली.

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात रंगलेल्या हल्लाबोल टास्कदरम्यान बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये वेगवेगळे वाद झालेत.

बिग बॉस मराठी 3’च्या (Bigg Boss Marathi 3 ) चावडीवर पुन्हा एकदा महेश मांजरेकरांनी स्पर्धकांची शाळा घेतली. होय, गेल्या आठवड्यात रंगलेल्या हल्लाबोल टास्कदरम्यान बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये वेगवेगळे वाद झालेत. चुकाही झाल्या. मग काय, काल शनिवारी रंगलेल्या स्पेशल एपिसोडमध्ये महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आले आणि त्यांनी स्पर्धकांची वागणूक आणि त्यांनी केलेल्या चूका यावर अनेकांची खरडपट्टी काढली.

मीराला पुन्हा झापलं...गेल्या आठवड्यात महेश मांजरेकरांनी मीरा जगन्नाथला (Mira Jagannath )चांगलंच सुनावलं होतं. कालच्या एपिसोडमध्येही मीरा त्यांच्या रडारवर आली.  हल्लाबोल टास्कदरम्यानही मीराने आक्रमकपणा दाखवत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.  महेश मांजरेकर यांनी यावरून मीराला अनेक गोष्टी सुनावल्या.‘या घरात बिग बॉसपेक्षा जास्त कोणाला अधिकार असतील तर ते मीराला. प्रत्येक बाबतीत काहीही झालं की मीराचं हे मला पटत नाही असतंच. तुला पटो वा न पटो आम्हाला काही फरक पडत नाही. हे बिग बॉस सिझन आहे मीरा जगन्नाथ हाऊस नाहीये,’ अशा शब्दांत मांजरेकरांनी मीराची बोलती बंद केली.

उत्कर्ष शिंदेचीही केली कानउघडलीकेवळ मीराचं नाही तर मांजरेकरांनी उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) याचीही कानउघडणी केली.   तू आत्तापर्यंतचा घरातील सर्वात वाईट संचालक होतास, असे ते म्हणाले. पहिल्या टीमचे सदस्य बाईकवर बसलेले असताना त्यांना बाईकवरुन उठवण्याचं काम दुस-या टीमकडे होतं. यावेळी दुसºया टीममधील गायत्री आणि जय यांनी मिरचीची धुरी तयार करत पहिल्या टीमच्या सदस्यांना जागेवरुन उठवण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्यावेळी दुस-या टीमची हा टास्क करण्याची वेळ आली तेव्हा जय आणि गायत्री हे बाईकवर बसले होते. यावेळी पहिल्या टीममधील सदस्य सोनालीने मिठाचं पाणी तयार करुन त्यांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला असता संचालक उत्कर्षने तिच्या हातातली मिठाच्या पाण्याची बाटली खेचून घेतली.उत्कर्षचं हे वागणं महेश मांजरेकर यांना खटकलं. समुद्रात पोहायला गेलास तेव्हा कधी त्रास झालाय का तुला? असा प्रश्न मांजरेकर यांनी उत्कर्षला विचारला.  मिरचीची धुरी दिली जात असताना तू ते थांबवलंस का? मिठाच्या पाण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. तू सर्वात वाईट व बायस्ड संचालक असल्याचं मांजरेकर म्हणाले.

 

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर