Join us

Bigg Boss Marathi 2 : OMG! वीणा शिवला सगळ्यांसमोर देणारेय 'हे' सरप्राईज, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 18:59 IST

वीणाच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला आहे. यंदाच्या सीझनचे विजतेपद शिव ठाकरेनं पटकावलं आहे. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख रुपये मिळाले आहेत. शिव हाच बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता. शिवला मिळालेल्या या यशामुळे तो चांगलाच खूश असून आता भविष्यात या पैशांचा कशाप्रकारे उपयोग करायचा हे देखील त्याने ठरवले आहे. 

बिग बॉसच्या घरात असताना शिव आणि वीणा जगताप यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. आता घराबाहेर पडल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम कायम असल्याचं पहायला मिळतंय. आता पुन्हा एकदा वीणाने इंस्टाग्रामवरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिने त्या दोघांचा कारमधील एक फोटो शेअर करत लिहिले की, आज रात्री ८.३० वाजता लाइव्ह येणार आहे. मी आज शिवला अ‍ॅडव्हान्समध्ये बर्थडे सरप्राईज देणार आहे आणि त्यासाठी त्याला मी घेऊन चालले आहे. सरप्राईज देताना लाइव्ह येऊ आम्ही.

आता वीणा काय सरप्राईज देणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

काही दिवसांपूर्वी वीणाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शिवसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाचा स्नॅपशॉट काढून शेअर केला आहे. त्यात ते दोघं हार्ट शेप बनविताना दिसत आहेत. वीणाने हे फोटो शेअर करून म्हटलं की सकाळी उठवलं माझ्या शेरनं. हॅप्पी जर्नी. कम सेफ.

शिव व वीणा या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.लग्नाविषयी विचारले असता तो सांगतो, आता बाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे. माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे.

शिव व वीणाचे चाहते ते दोघं लग्नबेडीत अडकणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.  

टॅग्स :बिग बॉस मराठीवीणा जगतापशीव ठाकरे