Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिव आणि वीणा म्हणतायेत, बिग बॉसमधील प्रेमप्रकरणावर त्यांच्या आई-वडिलांची असेल अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 18:30 IST

'बिग बॉस' घरातील या दोन स्‍पर्धकांमध्‍ये प्रेमाचा अंकुर बहरला असून शिव-वीणा हे दोघेही एकमेकांच्‍या प्रेमात गुंग झाले आहेत असेच आपल्याला आता म्हणावे लागेल.

ठळक मुद्देवीणा म्‍हणते, ''माझी मम्‍मा घरी गेल्‍यावर मला म्‍हणेल, तुला नॉर्मल फटके खायचे आहेत की बदामाचे फटके खायचे आहेत, तू सांगशील ते? मम्‍मा म्‍हणेल एक मिनिट जरा बस काय चालू आहे आम्‍हाला तरी सांग?''

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनला खूपच चांगला टिआरपी मिळाला होता. पहिल्या सिझनमधील स्पर्धकांमधील वाद तर चांगलेच गाजले होते. पण त्याहीपेक्षा या सिझनमधील राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा झाली होती. यामुळे हा कार्यक्रम चांगलाच वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला होता. विशेषत: राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील रोमान्स अक्षरश: मर्यादांचे उल्लंघन करणारा असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याविषयी काहीसा विरोधाचा सूर आवळला  होता.

बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमातील शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्‍यातील मैत्रीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. त्या दोघांमध्ये केवळ मैत्री आहे की, मैत्रीपेक्षा आणखी काही आहे का याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना लागलेली आहे. 

'बिग बॉस' घरातील या दोन स्‍पर्धकांमध्‍ये प्रेमाचा अंकुर बहरला असून शिव-वीणा हे दोघेही एकमेकांच्‍या प्रेमात गुंग झाले आहेत असेच आपल्याला आता म्हणावे लागेल. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये आपल्याला त्यांच्यातील रोमान्स पाहायला मिळत आहे. शिव नेहाला वीणाच्‍या कानातील हृदयाच्‍या आकाराचे इअररिंग्‍ज दाखवण्‍यासाठी 'पहला पहला प्‍यार है' गाणे म्‍हणत वीणाचे केस मागे करताना दिसत आहे. त्यावर नेहा त्याला विचारत आहे की, ''काय पहिला प्‍यार?'' त्यावर शिव बोलतो, ''नाही हा बिग बॉसमधला प्‍यार है!'' त्यावर नेहा शिव आणि वीणाला म्हणते, ''बरं, प्‍यार आहे असं आता तुम्ही मान्य करत आहात ?'' त्यावर हे दोघे लगेचच उत्तर देतात की, हे फक्‍त गाणं आहे. त्यावर नेहा त्यांची टर खेचत म्‍हणते की, आता प्रेमाची कबुली ही द्यावीच लागेल!

नेहासोबतच्‍या या संवादामुळे प्रेमीयुगुल शिव आणि वीणा बिग बॉसच्या घरातील प्रेमकरणाबाबत त्‍यांच्‍या आई-वडिलांच्‍या प्रतिक्रिया काय असेल यावर चर्चा करू लागतात. त्यावर वीणा म्‍हणते, ''माझी मम्‍मा घरी गेल्‍यावर मला म्‍हणेल, तुला नॉर्मल फटके खायचे आहेत की बदामाचे फटके खायचे आहेत, तू सांगशील ते? मम्‍मा म्‍हणेल एक मिनिट जरा बस काय चालू आहे आम्‍हाला तरी सांग?'' यावर शिव म्‍हणतो, ''माझी आई तर असा हात घेईल त्‍यावर लिपस्टिकने बदाम काढेल आणि मग मारेल.'' 

टॅग्स :बिग बॉस मराठीशीव ठाकरेवीणा जगताप