Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ : सॉरी बोलल्यानंतर हिनाला आवरलं नाही रडू, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 14:50 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठी सीझन २मध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडताना दिसत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठी सीझन २मध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात घरातील सदस्यांमध्ये विविध टास्क खेळताना चांगलीच चुरस पहायला मिळते आहे. त्यात कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री करणारी हिना पांचाळ रडताना पहायला मिळते. 

कलर्सने मराठी बिग बॉसच्या घरातील शेअर केलेल्या व्हिडिओत हिना वीणाला येऊन सॉरी बोलताना दिसते आहे. त्यावर वीणा तिला चहाची करण्याची पद्धत वेगळी असते. चव तीच येणार आहे असे म्हणाली. हिना सॉरी बोलल्यानंतर वीणा म्हणाली ती मनातून खरी आहे. तर वैशाली म्हणाली की तिच्या चेहऱ्यावर सॉरी होतं. तरी अभिजीत केळकर देखील म्हणाला की खरी मुलगी आहे. पण, सॉरी बोलून गेल्यानंतर हिना तिच्या बेडवर जाऊन रडताना दिसली. 

बिग बॉस मराठी 2’च्या घरातील सर्वप्रथम स्पर्धक शिवानी सुर्वेने या घरातून एक्झिट घेतली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकलेचे अटक नाट्य गाजले.

आता बिग बॉस मराठीचा स्पर्धक पराग कान्हेरे यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

होय, सहस्पर्धक नेहा शितोळे हिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :बिग बॉस मराठीहिना पांचाळ