Bigg Boss 19: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितक्याच आवडीने पाहिला जाणार शो म्हणजे बिग बॉस. हा शो नेहमीच चर्चेत असतो. आजवर 'बिग बॉस हिंदी' या रिअॅलिटी शोचे एकूण १८ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यात आता सध्या सर्वत्र हिंदी 'बिग बॉस'च्या १९ व्या पर्वाची जोरदार चर्चा सुरु आहे. अखेर हा बहुचर्चित कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या पर्वाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, 'बिग बॉस हिंदी'च्ं १९ वं पर्व देखील सलमान खान होस्ट करणार आहे. नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस हिंदीच्या नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. "भाई के साथ लौट आया है नया सीझन..., और इस बार चलेंगी ,घरवालों की सरकार...!", असं कॅप्शन देत 'Jio Hotstar' च्या अधिकृत एक्स अकाउंटवर नव्या सीझनचा धमाकेदार प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये सलमानचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतो आहे. येत्या २४ ऑगस्टपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या या पर्वात आता स्पर्धक म्हणून कोण एन्ट्री घेणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक 'बिग बॉस हिंदी'च्या १९व्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या सीझन कधी सुरु होणार याबद्दल माहिती समोर आली आहे. प्रेक्षक बिग बॉस हिंदी च्या १९ व्या सीझन रोज रात्री कलर्स हिंदी वाहिनीवर किंवा जिओ सिनेमा या ओटीटी अॅपवर पाहू शकतात. मजा, मस्ती आणि ड्रामा सुरु असणाऱ्या या शोमध्ये प्रेक्षकांना आता काय नवीन पाहता येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.