Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारसं आहे की कॉन्सर्ट? दुसऱ्यांदा आई झाली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, लेकाच्या बारश्याला आले ३० हजार लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 12:58 IST

एका इव्हेंटमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये हजारोंच्या संख्येने लोक दिसत आहेत. पण, हा व्हिडिओ कोणत्या कॉन्सर्टमधला नाही. तर अभिनेत्रीच्या लेकाच्या बारश्याचा आहे. 

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आवडत्या सिंगरच्या कॉन्सर्टला किंवा सेलिब्रिटींच्या इव्हेंटला चाहते गर्दी करताना दिसतात. अशाच एका इव्हेंटमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये हजारोंच्या संख्येने लोक दिसत आहेत. पण, हा व्हिडिओ कोणत्या कॉन्सर्टमधला नाही. तर अभिनेत्रीच्या लेकाच्या बारश्याचा आहे. 

बिग बॉस फेम अभिनेत्री सपना चौधरी दुसऱ्यांदा आई झाली. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. तिच्या लेकाचा नामकरण विधी सोहळा नुकताच पार पडला. या नामकरण सोहळ्याला सपना चौधरीच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. या सोहळ्याला तब्बल ३० हजार लोकांनी उपस्थिती दर्शविली होती. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 सोमवारी(११ नोव्हेंबर) सपना चौधरी आणि तिचा पती वीर साहू यांनी दुसऱ्या मुलाच्या बारश्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनीही हजेरी लावली होती. बब्बू मान यांनी सपना चौधरीला दुसरा मुलगा झाल्याचं सांगत त्याचं नावही जाहीर केलं. सपना आणि वीर साहू यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव शाह वीर असं ठेवलं आहे. 

२०२० साली सपना चौधरी आणि वीर साहू यांनी गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर सपनाने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव पोरस असं आहे. आता लग्नानंतर चार वर्षांनी ते दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत.  

टॅग्स :सपना चौधरीटिव्ही कलाकार