अमेरिका आणि इराणमधील संघर्ष सुरु असतानाच, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे २८ फेब्रुवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, भारताच्या अनेक राज्यांतील शिया मुस्लिम समाजातून शोक व्यक्त केला जात आहे. 'बिग बॉस १९' मध्ये दिसलेली फरहाना भट्ट हिने देखील खामेनेई यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे. मात्र यामुळे ती काही नेटकऱ्यांच्या निशाण्यावरही आली आहे.
फरहानाने 'इन्स्टंट बॉलिवूड'शी संवाद साधताना खामेनेई यांना श्रद्धांजली वाहिली. ती म्हणाली की, "ते एक असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांना कधीही विसरता येणार नाही. ते नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहतील आणि अल्लाह त्यांच्या शहादतचा स्वीकार करो. काश्मीरमधील अनेक लोक या घटनेने दुखी झाले असून सर्वांचे हृदय पिळवटून निघाले आहे." फरहानाने पुढे सांगितले की, या घटनेमुळे ती रात्रभर झोपू शकली नाही आणि तिच्या मते खामेनेई हे अनेकांसाठी 'मसिहा' होते.
मात्र, फरहानाचे हे विधान नेटकऱ्यांना अजिबात आवडलेले नाही. एका युजरने तिला सुनावताना म्हटले की, "फरहाना, सत्य जाणून घेतल्याशिवाय अशा गंभीर विषयावर बोलू नकोस. इराणमध्ये अनेक निष्पाप लोकांनी आणि तरुण मुलींनी अत्याचार सहन केले आहेत. हा विषय धर्माचा नसून मानवतेचा आहे, त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी भाष्य करू नकोस." तर दुसऱ्या एका युजरने तिला टोला लगावत विचारले की, 'जर तू त्यांचे इतके समर्थन करते, तर स्वतः बुर्का का घालत नाही?'
वर्कफ्रंट
'बिग बॉस १९' नंतर ती अलीकडेच अमाल मलिकसोबत 'यहीं गुझार दूँ' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'लैला मजनू' या चित्रपटातून केली होती आणि ती 'सिंघम अगेन'मध्येही एका छोट्या भूमिकेत झळकली होती. सध्या तिच्या या राजकीय आणि धार्मिक विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
Web Summary : Farhana Bhatt's tribute to Iranian leader Khamenei sparked controversy. She expressed grief over his death, calling him unforgettable. Netizens criticized her statement, citing human rights issues in Iran and questioning her support.
Web Summary : ईरानी नेता खामenei को फरहाना भट्ट की श्रद्धांजलि पर विवाद हुआ। उन्होंने उनकी मृत्यु पर दुख व्यक्त किया, उन्हें अविस्मरणीय बताया। नेटिज़न्स ने ईरान में मानवाधिकारों के मुद्दों का हवाला देते हुए उनके बयान की आलोचना की।