Join us

'बिग बॉस' फेम अभिनेत्याने खरेदी केली कोटींची Range Rover, किंमत ऐकून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:29 IST

बिग बॉस फेम अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्याने नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

'बिग बॉस' फेम अंकित गुप्ता गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. अंकित गुप्ता आणि प्रियांका चाहर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अंकित गुप्ताने नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. गाडीचे फोटो अंकितने शेअर केले आहेत. 

अंकितने रेंज रोव्हर कंपनीची आलिशान कार खरेदी केली आहे. कारचे फोटो त्याने शेअर करत "मला पालक, मित्र आणि माझे चाहते या सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो", असं म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अंकितने घेतलेल्या या कारची किंमत तब्बल २.४ कोटींच्या घरात आहे. 

दरम्यान, अंकित गुप्ता हा प्रियंका चहरसोबत असलेल्या त्याच्या रिलेशनशिपमुळेदेखील चर्चेत होता. 'बिग बॉस'मुळे ते एकत्र आले होते. पण, आता त्यांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. त्या दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. अंकितने ड्रीम कार खरेदी केल्याच्या पोस्टला प्रियंकाने लाइक केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार