Join us
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षी मिसकॅरेज झालं अन् आता 'बिग बॉस' फेम अभिनेत्री पुन्हा गरोदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 14:57 IST

बिग बॉस फेम अभिनेत्री प्रिया मलिक आई होणार असल्यानेे लोकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय

रिॲलिटी शो 'बिग बॉस 9' फेम (Bigg B0ss) प्रिया मलिक (Priya Malik) आई होणार आहे. प्रियाने ही आनंदाची बातमी इन्स्टाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रियाने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोत प्रिया आणि तिचा पती दिसत आहे. प्रियाच्या या गुड न्यूजबद्दल तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव करत तिचं अभिनंदन केलंय. 

प्रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या गाऊन ड्रेसमध्ये दिसत आहे. ती तिचा नवरा करणचा हात पकडून तिचा बेबी बंप दाखवत आहे. फोटो शेअर करताना प्रियाने कॅप्शनमध्ये , "मी आई होणार आहे." असं लिहिलंय. प्रिया मलिकने अलीकडेच एका मुलाखतीत शेअर केलं होतं की, 2023 मध्ये तिला मिसकॅरेजला सामोरं जावं लागलं. कारण त्यावेळी तिची अनियोजित गर्भधारणा झाली होती. त्यामुळे यावेळीही प्रियाच्या मनात धाकधूक असून तिला प्रचंड तणावाला सामोरं जावं लागत आहे.

 

प्रियाचे पहिले लग्न 13 एप्रिल 2008 रोजी भूषण मलिकसोबत झाले होते. भूषण पेशाने एनआरआय होता. मात्र लग्नाच्या दहा वर्षांनंतर हे जोडपे वेगळे झाले. पुढे  दिल्लीत राहणाऱ्या करणच्या प्रेमात प्रिया पडली. 2022 मध्ये प्रियाने करण बक्षीशी लग्न केले. प्रिया आणि करण दोघेही बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. 

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजन