Join us

'बिग बॉस १९' मधून प्रणित मोरेला 'या' आजारामुळे बाहेर काढले, चाहते चिंतेत, घरात होणार का 'कमबॅक'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:56 IST

'बिग बॉस १९’ च्या सेटवरून एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे शोच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

यंदा 'बिग बॉस १९'च्या घरात प्रणित मोरे हा एकमेव मराठी स्पर्धक सहभागी झाला होता. प्रणितला चाहते 'महाराष्ट्रीयन भाऊ' म्हणून देखील ओळखतात. बिग बॉसच्या घरातील त्याचा खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. त्याने अल्पावधीतच सर्वांची मनं जिंकून घेतली. मात्र, 'बिग बॉस'च्या सेटवरून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 'बिग बॉस १९'च्या घरातून प्रणित मोरे बाहेर पडला आहे. त्याच्या अचानक बाहेर पडण्याने चाहते चिंतेत पडले आहेत.

'वीकेंड का वार'चे एपिसोड सलग शूट होत असल्याने, सेटवरच्या काही अपडेट्स लीक झाल्या आहेत. त्यामुळे आजचा एपिसोड प्रसारित होण्याआधीच अपडेट समोर आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रणित मोरे आठवड्याच्या 'वीकेंड का वार'मध्ये एलिमिनेट झाला आहे. तो आजारी असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, प्रणित मोरेला डेंग्यूचे निदान झालं आहे.  प्रणित मोरे आजारी होता. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी त्याला घराबाहेर काढण्यात आले.

सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येणार?

प्रणित मोरेच्या बाहेर पडण्याने त्याच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. प्रणित मोरे पूर्णपणे बरा झाल्यावर आणि डॉक्टरांची वैद्यकीय परवानगी मिळाल्यानंतर त्याला घरात पुन्हा प्रवेश दिला जाईल. काही फॅन पेजेसनी तो सिक्रेट रूममध्ये गेला असल्याचा दावा केला होता. मात्र सध्या तो सिक्रेट रूममध्ये नसून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी अधिकृत माहिती फॅन पेजेसवर शेअर करण्यात आली आहे. डेंग्यूसारख्या गंभीर आजारामुळे प्रणितला शोमधून बाहेर जावे लागल्याने चाहते निराश झाले आहेत. तो लवकर बरा होऊन पुन्हा घरात दमदार एन्ट्री करेल, अशी आशा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pranit More exits 'Bigg Boss 19' due to illness; fans worried.

Web Summary : Marathi contestant Pranit More left 'Bigg Boss 19' due to dengue. Fans are concerned about his health and potential return after recovery. He is currently hospitalized.
टॅग्स :बिग बॉस १९सेलिब्रिटीबॉलिवूड